उन्हाळी परीक्षा सात मार्चपासून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सात मार्चपासून या सत्रातील परीक्षांना सुरुवात होणार आहे. पाच टप्प्यात एक हजार 71 परीक्षा घेण्यात येणार आहेत. मे महिन्याच्या शेवटपर्यंत परीक्षा संपवून 10 जूनपर्यंत सर्व निकाल लावण्यात येतील, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. 

पहिल्या टप्प्यात एकूण 109 परीक्षा घेण्यात येतील. त्यात प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि कमी पेपर असलेल्या विषयांच्या परीक्षांचा समावेश आहे. मार्चपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात 282 परीक्षा घेण्यात येतील. यात वार्षिक पद्धतीनुसार होणाऱ्या बी.ए, बीएससी, बी. कॉम. परीक्षांचा समावेश आहे. एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात बीएससी तिसरे व पाचवे सत्र, एम.ए. पहिले व तिसरे सत्र आदी शंभर परीक्षांचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात 349 तर पाचव्या टप्प्यात 391 परीक्षा घेण्यात येतील. त्यामध्ये एम.ए. दुसरे आणि चौथे सत्र परीक्षा, एम.एस.सी, एम. कॉम या परीक्षांचा समावेश आहे. शेवटच्या सत्रात सर्व अभियांत्रिकी परीक्षांचा समावेश करण्यात आला आहे. 

वर्ष वाया जाणार नाही - डॉ.प्रमोद येवले 

निकालास उशीर झाल्यामुळे इतर अभ्यासक्रमांत विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. प्रवेशाच्या शेवटल्या तारखा आल्या तरी विद्यापीठाचे निकाल न लागल्यामुळे या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते. त्यामुळे या सत्रापासून महत्त्वाच्या विशेषत: शेवटल्या सत्रातील परीक्षेचे निकाल लवकर लावण्यात येणार आहेत. यासाठी 10 जूनपर्यंत महत्त्वपूर्ण सर्वच निकालांची घोषणा करण्यात येणार असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले. 

टप्पा तारीख परीक्षा 

पहिला टप्पा - सात मार्च - 109 

दुसरा टप्पा - 21 मार्च - 282 

तिसरा टप्पा - 11 एप्रिल - 100 

चौथा टप्पा - 20 एप्रिल - 349 

पाचवा टप्पा - 28 एप्रिल - 231

Web Title: Summer exams from March seven