उन्हाची लाट कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

नागपूर - विदर्भात उन्हाच्या लाटेने अपेक्षेप्रमाणे रौद्र रूप धारण केले असून, तापमानाने ब्रह्मपुरी येथे ४६.७ अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला आहे. चंद्रपूर व नागपूरसह विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये सूर्याचा तीव्र प्रकोप जाणवला. 
 प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात बुधवारपासून तीन दिवस तीव्र लाटेचा इशारा दिला होता. 

त्याचा परिणाम विदर्भात सर्वत्र दिसून आला. उन्हाचे सर्वाधिक चटके पूर्व विदर्भातील ब्रह्मपुरी व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये जाणवले. ब्रह्मपुरीत पाऱ्याने या मोसमात प्रथमच ४६.७ अंशांचा उच्चांक गाठला. चंद्रपूर येथे ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरातही पाऱ्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी येथे ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. वर्धा (४४.५ अंश सेल्सिअस), अकोला (४४.१ अंश सेल्सिअस) आणि यवतमाळ (४३.५ अंश सेल्सिअस) जिल्हेही उन्हाच्या लाटेखाली आहेत. विदर्भातील उष्णलाट आणखी दोन दिवस कायम राहणार आहे.

Web Title: summer temperature heat