विदर्भात उष्णतेची लाट दीर्घकाळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नागपूर - विदर्भात उन्हाचे चटके पुन्हा वाढले असून, नागपूरसह बहुतांश जिल्ह्यांमध्ये सोमवारी कमाल तापमानात लक्षणीय वाढ दिसून आली. शहरात पारा एका अंशाने वाढला, तर विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे करण्यात आली. प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात दीर्घकाळ उष्णलाटेचा इशारा दिल्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची आवश्‍यकता आहे.   

संपूर्ण उत्तर भारत वादळाच्या सावटाखाली असताना विदर्भात मात्र सूर्याचा प्रकोप सुरू आहे. उन्हाचा सर्वाधिक प्रभाव ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये दिसून आला. हवामान विभागाने विदर्भात ११ मेपर्यंत उष्णलाटेचा प्राथमिक इशारा दिला असला, तरी ही लाट दीर्घकाळ राहण्याची दाट शक्‍यता आहे.

काय करू नये?
तीव्र उन्हात मुख्यत्वे सुमारे १२ ते ३ या वेळेत बाहेर जाणे टाळावे.
गडद घट्ट कपडे घालणे टाळावे.
बाहेर तापमान अधिक असल्यास  अत्याधिक शारीरीक श्रमाची कामे टाळावीत.

काय करावे?
पुरेसे पाणी पीत राहावे
चहा कॉफी व कार्बोनेट शीतपेय पिण्याचे टाळावे.
हलक्या रंगाच्या सुती कपड्याचा वापर करावा.
घराबाहेर पडताना छत्री, सनकोट, टोपी, गॉगलचा वापर करावा.

डाॅक्टरांचा घ्या सल्ला
चक्कर येत  असल्यास किंवा आजारी असल्यास त्वरीत डॉक्टराकडे जावे, ओआरएस, ताक , लिंबू ,पाणी याचा वापर करावा. एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान वाढल्यास त्याला थंड जागी ठेवा. त्याचे शरीराचे तापमान खाली आणण्याचा  प्रयत्न करा. ओल्या कापडाने पुसत राहा.

प्राण्यांची घ्या काळजी
उष्णताम वाढल्याने त्याचा फटका पाळीव प्राण्यांनाही बसत आहे. त्यामुळे प्राण्यांना सावलीत नेऊन भरपूर पाणी प्‍यायला द्यावे.

Web Title: summer temperature increase environment