नागपूर @ ४७.५; उष्माघाताने ३ मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

उन्हाच्या लाटेने आज विदर्भात कहर केला. चोवीस तासांत नागपूरच्या पाऱ्यात एका अंशाची वाढ होऊन पाऱ्याने या मोसमातील ४७.५ अंशांचा नवा उच्चांक नोंदविला. गेल्या सहा वर्षांतील हे सर्वाधिक तापमान ठरले. नागपूरचा या शतकातील तापमानाचा विक्रम ४७.९ अंश सेल्सिअस इतका आहे, जो २३ मे २०१३ रोजी नोंदला गेला होता.

नागपूर - यंदाच्या उन्हाळ्यात मंगळवारचा दिवस नागपूरकरांसाठी अतिशय तापदायक ठरला. प्रादेशिक हवामान विभागाने आज शहरात नोंदविलेले ४७.५ अंश सेल्सिअस तापमान गेल्या सहा वर्षांतील सर्वाधिक ठरले. शतकातील तापमानाचा विक्रम केवळ अर्धा अंश दूर असून, सूर्याचा कहर लक्षात घेता हा विक्रम बुधवारी मोडीत निघण्याची शक्‍यता आहे.  दरम्यान, उष्माघातेने शहरातील विविध भागांत तिघांचा मृत्यू झाला आहे.

उन्हाच्या लाटेने आज विदर्भात कहर केला. चोवीस तासांत नागपूरच्या पाऱ्यात एका अंशाची वाढ होऊन पाऱ्याने या मोसमातील ४७.५ अंशांचा नवा उच्चांक नोंदविला. गेल्या सहा वर्षांतील हे सर्वाधिक तापमान ठरले. नागपूरचा या शतकातील तापमानाचा विक्रम ४७.९ अंश सेल्सिअस इतका आहे, जो २३ मे २०१३ रोजी नोंदला गेला होता.

शहरात उष्माघाताचा उद्रेक
उन्हाच्या कडाक्‍यामुळे शहरात उष्माघाताचा उद्रेक वाढला आहे. ऊन सहन न झाल्याने शहरातील विविध भागांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. गणेश पेठ, कॉटन मार्केट परिसरात अंदाजे ४५ ते ५० वयोगटातील एक अनोळखी व्यक्‍ती मृतावस्थेत आढळून आली. याच भागातील राममंदिर गेटसमोर, रामझुला येथे एक ६७ वर्षीय व्यक्‍ती बेशुद्धावस्थेत आढळून आली. मेयो रुग्णालयात भरती केले असता डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. उष्माघातामुळे तिसरा मृत्यू कोतवाली परिसरात झाला. अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी व्यक्‍ती एम्पायर ट्रान्सपोर्ट कॅरिअर या दुकानाच्या पायरीवर मृतावस्थेत आढळली. तिघांचाही मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.

प्रमुख शहरांत कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
नागपूर    ४७.५
चंद्रपूर    ४७.९
ब्रह्मपूरी    ४६.९
वर्धा    ४६.५
गडचिरोली    ४६.०
अमरावती    ४५.८
अकोला    ४५.६
गोदिंया    ४५.५
यवतमाळ    ४५
नांदेड    ४५
परभणी    ४६
हिंगोली    ४४


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Summer Temperature Increase Sunstroke 3 Death