११ दिवसांत उष्माघाताचे ७८ रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नागपूर जिल्ह्यात १०७ रुग्ण, ६ संशयितांचा मृत्यू, चौकशी सुरू
नागपूर - सूर्य आग ओकत आहे. उकाडा प्रचंड वाढला असल्याने गेल्या अकरा दिवसांत शहरात विविध भागांत उष्माघाताचे ७८ रुग्ण आढळून आले आहेत. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत १०७ उष्माघाताचे रुग्ण आढळले. उष्माघातसदृश आजाराने ६ जणांचा मृत्यू झाला असून त्याचा तपास आरोग्य विभागाकडून सुरू आहे. शवविच्छेदन अहवालातूनच या रुग्णांच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे येणार आहे.

उपराजधानीतील तापमान ४४.५ अंश सेल्सिअसवर गेले आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. सर्वत्र तापासह गॅस्ट्रो, अतिसार यासह उन्हामुळे होणाऱ्या विविध आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. नागपूरच्या मेडिकल, मेयो, आयसोलेशनसह सर्व खासगी रुग्णालयांत गेल्या दहा दिवसांत चारशेहून जास्त गॅस्ट्रो वा त्यासदृश्‍य आजारांच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णांना उन्हापासून त्रास झाल्यास त्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे उष्माघाताच्या संवर्गात होते. या विभागाकडे २६ एप्रिल २०१८ पर्यंत ६२ उष्माघाताच्या रुग्णांची नोंद होती. परंतु त्यानंतर सतत कमी-अधीक प्रमाणात तापमान वाढ झाली. त्यामुळे पुढच्या अकरा दिवसांत आजपर्यंत नवीन ७८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या उष्माघाताच्या रुग्णांची संख्या आता थेट १४० वर पोहचली आहे. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना त्वरित रुग्णांवर योग्य उपचार करून त्याची नोंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहे. महापालिकेच्या रुग्णालयांत आवश्‍यक औषधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: summer temperature sunstroke patient increase