‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ची ‘समर यूथ समिट’ आजपासून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

नागपूर - करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना, यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने आणली आहे. युवकांसाठी ‘यिन’ करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून होणाऱ्या तीन दिवसांच्या ‘यिन समर यूथ समिट २०१८’मध्ये उद्योग, राजकारण, डिजिटल ऑनलाइन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा होणार आहेत. 

ग्लोकल स्वेअर, अभ्यंकर रोड, मुंजे चौक, सीताबर्डी, नागपूर येथे होणाऱ्या ‘समिट’चे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. १) सकाळी १०.०० वाजता होणार आहे. उद्‌घाटन सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, जी. एच. रायसोनी विद्यापीठाचे चेअरमन सुनील रायसोनी, स्प्रेक्‍टम ॲकेडमीचे सुनील पाटील, ‘यिन’चे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी तसेच ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक शैलेश पांडे उपस्थित असतील.  

पदवीचे शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील तरुणांना उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग करत शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी ‘समर यूथ समिट’ मोलाची भूमिका बजावणार आहे. गेली दोन वर्षे ‘यिन’ ही शिबिरे आयोजित करीत आहे. शिबिर सलग तीन दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत तीन सत्रांत होईल. 

‘यिन समर यूथ समिट 2018’
केव्हा - शुक्रवार (ता. १) ते शनिवार (ता. ३) सकाळी ९ ते सायंकाळी ५ 
कोठे - ग्लोकल स्क्‍वेअर, अभ्यंकर रोड, मुंजे चौक, सीताबर्डी, नागपूर

यांच्या सहकार्याने... 
जी. एच. रायसोनी विद्यापीठ, ग्लोकल स्क्‍वेअर, गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना

Web Title: summer youth summit Young Inspirators network