909 वर्षांपूर्वी आला होता असा योग; वाचा काय होते कालच्या तारखेचे महत्त्व

date palindrome.jpg
date palindrome.jpg

अकोला : धावपळीत वेळेप्रमाणे तारखेवर सर्वस्व अवलंबून असते. यामध्येच कालची काही वेगळ्याच गंमत जंमतीची तारीख होती. कालचा दिवस इतर कोणत्याही दिवसांपेक्षा वेगळा दिवस होता. रविवार 02/02/2020 या तारखेला पॅलिंड्रोम तारीख म्हणूनही ओळखल्या जाते. हा योग जवळपास 909 वर्षांनी आला होता.

मनुष्याच्या जीवनात तारखेला सर्वाधिक महत्त्व आहे. या तारखांच्या खेळात काही तारखा ह्या दुर्मिळ प्रमाणात येतात. यामध्येच कालची तारीख आहे. कालची तारीख 2 फेब्रुवारी, 2020 किंवा 02/02/2020 अशी आहे. ही एक पॅलिंड्रोम तारीख आहे. म्हणजे जी तारीख उलटसुलट कशीही वाचता येते, त्या तारखेला पॅलिंड्रोम असे म्हटले जाते. या शतकात विशेष अनुक्रमे येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही काही जाणकारांचे म्हणणे आहे.

कशी आहे पॅलिंड्रोम तारीख?
एक सारखी आठ-अंकी तारीख विशेषत: दुर्मिळ आहे. ही तारीख अमेरीकेमध्येही लागू पडते. कारण तेथे तारखी ही दिवस-महिना-वर्ष म्हणून लिहिलेली असते आणि इतर देशांमध्ये जेथे तारीख महिना-दिवस-वर्ष म्हणून लिहिली जातात. 11/11/1111 रोजी 909 वर्षांपूर्वी अशा प्रकारची पॅलिंड्रोम शेवटची वेळ झाली. जेव्हा कॅलेंडर 12/12/2121 वर वळणार तेव्हा पुन्हा असा योग येईल. जगभरातील पालिंड्रोमचे दिवस भिन्न असतात. कारण वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या तारखेचे स्वरूप असते.

या शतकात केवळ 12 आठ-अंकी पॅलिंड्रोम तारखा
युनिव्हर्सिटी ऑफ पोर्टलँडचे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे प्राध्यापक अजीज इनान यांनी वॉशिंग्टन पोस्टला सांगितले की, या शतकात केवळ 12 आठ-अंकी पॅलिंड्रोम तारखा आहेत. ते म्हणाले, अमेरिकन तारीख प्रणालीत महिना, दिवस, वर्ष अशी आहे. या शतकात 12 आठ-अंकी पॅलिंड्रोम तारखा आहेत. परंतु या शतकात अशी फक्त एक पालिंड्रोम तारीख आहे, ज्याला आठ आकड्यांसह व्यक्त केले गेले आहे. जिथे आपल्याकडे उजवीकडे पूर्ण वर्षाचा नंबर आहे. ते म्हणाले, तुम्ही युरोप, आशिया, अमेरिकेत असाल तरी ते त्याच कॅलेंडरच्या दिवशी होते. यावर्षी फेब्रुवारीला अतिरिक्त दिवस असल्याने हा रविवारी वर्षाचा 33 वा दिवस असून, आणखी 333 दिवस बाकी आहेत.

2020 ते 2021 पर्यंत पालिंड्रोमचे दिवस
2 फेब्रुवारी, 2020 (02-02-2020)
11 फेब्रुवारी, 2020 (02-11-20)
22 फेब्रुवारी, 2020 (02-22-20)
11 डिसेंबर, 2021 (12-11-21)
22 डिसेंबर 2021 (12-22-21)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com