रविवार, सोमवारीही भरा वीजबिल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

नागपूर - शासकीय सुटी असली तरी रविवार आणि सोमवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार आहे. वैयक्तिक व घरगुती वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी जुन्या पाचशे व एक हजारांच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहे.

नागपूर - शासकीय सुटी असली तरी रविवार आणि सोमवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार आहे. वैयक्तिक व घरगुती वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी जुन्या पाचशे व एक हजारांच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहे.

रविवारी सकाळी 10 ते रात्री 7 पर्यंत तसेच सोमवारी सकाळी 10 ते मध्यरात्री 12 पर्यंत राज्यातील महावितरणचे सर्व वीज देयक भरणा केंद्र सुरू राहणार आहेत. वीजबिलाच्या किमती एवढ्याच रकमेच्या जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येतील. त्यासाठी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. वीजबिलापोटी आगाऊ स्वरूपात देयक स्वीकारले जाणार नाही. वीज ग्राहकांना त्वरित वीजबिल भरता यावे, यासाठी आवश्‍यक पूर्वतयारीसह सर्वच केंद्रांवर महावितरणच्या नियमित कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी दिवसभर जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी ग्राहकांचे अर्ज भरून देण्यास सहकार्य करतील. हे अर्ज महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

Web Title: Sundays, Mondays fill electricity bill

टॅग्स