11 लाखांची सडकी सुपारी जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

11 लाखांची सडकी सुपारी जप्त  
नागपूर : अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने कळमना येथील एस.पी. ट्रेडर्सवर छापा टाकून अकरा लाख रुपये किमतीची सडकी सुपारी जप्त केली. पथकाने गोदामाला सील करून सुपारीचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. यामुळे सुपारी व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

11 लाखांची सडकी सुपारी जप्त  
नागपूर : अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने कळमना येथील एस.पी. ट्रेडर्सवर छापा टाकून अकरा लाख रुपये किमतीची सडकी सुपारी जप्त केली. पथकाने गोदामाला सील करून सुपारीचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. यामुळे सुपारी व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सडक्‍या सुपारीची विक्री केली जात असल्याची तक्रार अन्न औषधी प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार अन्न औषधी प्रशासन विभागाच्या पथकाने कळमना येथील एस.पी. ट्रेडर्सच्या कारखान्यावर पोहोचले आणि छापा टाकला. छापा पडताच कारखान्यात धावपळ उडाली. कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सुपारीमध्ये आठ टक्के सडकी सुपारी ठेवण्याची परवानगी कायद्याने दिलेली आहे. सुपारीच्या नमुनाच्या अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली. अन्न औषधी विभागाचे निरीक्षक विनोद धवड आणि प्रफुल्ल चोपडे यांनी अन्न औषधी विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे आणि अधिकारी मिलिंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. एस.पी. ट्रेडर्सचे संचालक मौर्य असल्याची माहिती पुढे आली आहे.
गोदाम सील; नमुने तपासणीसाठी
तेथील विदेशातील सुपारीने भरलेल्या बोऱ्यांची तपासणी केली. त्यात प्रथमदर्शनी निकृष्ट दर्जाची सडकी सुपारी असल्याचे दिसून आले. एस.पी. ट्रेडर्सची सहा हजार 538 किलो सुपारी जप्त केली आहे. या सुपारीवर प्रक्रिया करून विकण्यात येत असल्याची माहिती आहे. तेथील सुपारीचे नमुने घेण्यात आले आहे. ही सुपारी शरीरासाठी हानिकारक असल्याचे सूत्रांनी सांगितले. अन्न औषध प्रशासन विभागाने गोदामाला सील करून नमुने तपासणीसाठी पाठविले.

Web Title: supari news