सुपरची ब्रांकोस्कोपी बंद

file photo
file photo

नागपूर : आधुनिक काळात दम्यासह न्यूमोनिया व इतर श्‍वसनविकारासह कॅन्सर आणि इतर आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आजारांचे निदान करणारे ब्रांकोस्कोपी हे यंत्र मंगळवारी (ता. 20) बंद पडले. याचा फटका मात्र रुग्णांना बसत आहे.
डिकलशी संलग्न असलेला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गरिबांसाठी वरदान ठरले आहे. मात्र, येथे उपचारासाठी आवश्‍यक यंत्रसामग्रीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने वारंवार यंत्र बंद पडतात. सुपरच्या श्‍वसनरोग विभागात आवश्‍यक असलेल्या ब्रांकोस्कोपी या यंत्रावर कित्येक वर्षांपासून निदान सुरू आहे. या यंत्रावर क्षमतेपक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. मात्र, अचानक या यंत्रामध्ये बिघाड आला. यंत्र देखभालीसाठी एएमसी केली आहे.
सुपर स्पेशाटिलीमध्ये कॅथलॅब, फॅब्रोस्कॅनसह 79 प्रकारच्या यंत्रसामग्री आहेत. वॉरंटी संपल्यानंतर या यंत्रांच्या देखभालीसाठी (एएमसी, सीएमसी) दरवर्षी 75 लाखांच्या निधीची गरज आहे. मात्र, 2018 मध्ये केवळ चार ते पाच लाख देऊन राज्य सरकारकडून बोळवण करण्यात आली. यामुळे यंत्र वारंवार बंद पडतात. याचा फटका मात्र विदर्भासहित आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातून आलेल्या रुग्णांना बसतो. यंत्र बंद असल्यामुळे मंगळवारी अनेक रुग्णांना आल्या पावली परत जावे लागल्याची माहिती पुढे आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com