हृदय शल्यचिकित्सेसाठी सुपर ठरतेय वरदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील हृदय शल्यचिकित्सा विभाग रुग्णांसाठी वरदान आहे. या विभागाने दर्जेदार उपचारातून पूर्वीचा वाढलेला 20 टक्के मृत्युदर कमी करीत सात टक्‍क्‍यांवर आणला. जुलै 2018 ते जून 2019 या काळात सुपरच्या हृदयरोग शल्यक्रिया विभागाने तब्बल 363 जणांचे हृदय जिंकले. 25 जण दगावले असले तरी हा मृत्युदर एक टक्‍क्‍यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

वर्षभरापूर्वी सुपर स्पेशालिटीच्या हृदयरोग शल्यचिकित्सा विभागात हृदय शल्यचिकित्सक डॉ. निकुंज पवार यांनी पदभार स्वीकारला. यानंतर सुपरमध्ये दररोज बायपास सर्जरी होऊ लागली. सुपरच्या हृदयरोग शल्यचिकित्सा विभागात डॉ. पवार रुजू होण्यापूर्वी 2017 ते 2018 जुलैपर्यंतच्या काळात 538 रुग्णांवर हृदयशल्यक्रिया करण्यात आल्या. यापैकी 35 जणांना हृदयशल्यक्रियेनंतर गुंतागुंत झाल्याने त्यांच्यावर पुन्ह्‌ा शल्यक्रिया करण्याची वेळ आली. याखेरीज हृदयशल्यक्रिया झाल्यानंतरही झालेली गुंतागुंत आटोक्‍यात आणता न आल्याने हे रुग्ण हृदयशल्यक्रियेनंतर दगावले. हा मृत्यूदर सरासरीने 20 टक्‍क्‍यांवर पोहचला होता. 109 जण दगावले होते. या मृत्यूंची दखल वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतली होती. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी हृदय शल्यचिकित्सक डॉ. निकुंज पवार यांची सुपरमध्ये नियुक्ती केली. त्यानंतर जुलै 2018 ते जून 2019 या काळात केवळ तीन रुग्णांमध्ये शल्यक्रियेनंतर गुंतागुंत निर्माण झाली. त्यांच्यावर पुन्हा शल्यक्रिया करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: super hospital news