चार महिन्यांपासून नाही वेतन

नागपूर - चार महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असलेले कर्मचारी.
नागपूर - चार महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असलेले कर्मचारी.

नागपूर - मेडिकलशी संलग्नित असलेल्या सुपर स्पेशालिटीमध्ये क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून काम करीत असलेल्या पन्नास कर्मचाऱ्यांचे तब्बल चार महिन्यांपासून वेतन झालेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सुपर स्पेशालिटीच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांपासून तर मेडिकलच्या अधिष्ठात्यांकडे कैफियत मांडूनही काही उपयोग झाला नसल्याचे कर्मचारी हताशपणे सांगतात.

गेल्या दोन वर्षांपासून १०-१० तास मेहनत विकल्यानंतर क्रिस्टल कंपनीकडून वेतन मिळालेले नाही. राज्य शासनाने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती बंद करीत आउटसोर्सिंगचा पर्याय  स्वीकारला. क्रिस्टल कंपनीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काही कर्मचारी नियुक्त करण्याचे कंत्राट मिळाले. मागणीनुसार, ४० ते ५० कर्मचारी सफाई कामगारांपासून तर शिपायापर्यंतची सेवा इमाने इतबारे निभावत आहेत. मोठ्या संख्येने रुग्‍ण असलेल्‍या सुपरमध्ये कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा देऊन आपले कर्तव्‍य निभावत आहेत. नोकरीत स्थायी करावे, अशीही त्यांची मागणी नाही. स्थानिक सुपर स्पेशालिटी प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी आवश्‍यक असणारी रक्कम दरमहा  क्रिस्टल एजन्सीच्या खात्यात वळती केली जाते. 

सुपर प्रशासनाने वेतनाची रक्‍कम अदा करूनही या कर्मचाऱ्यांना तब्बल चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. ही बाब उघडकीस आल्यानंतर सुपर स्पेशालिटीचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी कंपनीशी संवाद  साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही वेतन मिळाले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com