COVID19 : स्वतःच्या मुलापासून 56 दिवस दूर राहून दिला असाही लढा; गरोदर स्त्रियांच्या सेवेत आनंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

कोविड 19 रोगाच्या साथी मध्ये कोरोना वॉरिअर्स आपापल्या आघाड्यांवर चोख कामगिरी बजावत आहेत. त्याद्वारे होणार्‍या मानवतेच्या सेवेचा आनंद व समाधान स्वतःसह, कुटुंब तसेच परिसरात व्यक्त होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.

देऊळगावराजा (जि.बुलडाणा) : बुलडाणा स्त्री रुग्णालयात कोरोना वॉर्डात सेवा देणार्‍या अधिपरीचारिका अनुराधा रंजीत खिल्लारे (सपकाळ) गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या सेवेत आहे. कोरोना संसर्गाची भीती न बाळगता आवश्यक दक्षता बाळगून आपले कर्तव्य मोठ्या तत्परतेने पार पाडत आहे. दरम्यान 56 दिवस आपल्या सहा वर्षीय मुलापासून दूर राहून त्यांनी दिलेला कोरोना अशी लढा समाजासाठी अभिमानास्पद बाब ठरली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोविड 19 रोगाच्या साथी मध्ये कोरोना वॉरिअर्स आपापल्या आघाड्यांवर चोख कामगिरी बजावत आहेत. त्याद्वारे होणार्‍या मानवतेच्या सेवेचा आनंद व समाधान स्वतःसह, कुटुंब तसेच परिसरात व्यक्त होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. असाच एक प्रकार स्वतःच्या सहा वर्षीय मुलापासून दूर राहत, स्त्री रुग्णालयातील कोरोना वॉर्डात सेवा देणार्‍या अधिपरिचरिका अनुराधा सपकाळ खिल्लारे यांच्या बाबतीत आढळून आला आहे. 

आवश्यक वाचा - Video : अखेर पोलिसांनी डागली कारवाई तोफ, बेकायदेशीर सुरू होता हा व्यवसाय

तालुक्यातील देऊळगावमही येथील ग्रामीण रुग्णालयात रणजित खिल्लारे हे प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून तर पत्नी अनुराधा सपकाळ खिल्लारे या अधिपरिचरिका म्हणून सेवारत होत्या. अनुराधा सपकाळ खिल्लारे यांची  प्रशासकीय बाबींमुळे बुलडाणा येथे बदली झाली आहे. तेथेही कोरोना वॉर्ड असलेल्या स्त्री रुग्णालयात त्यांची ड्यूटी लागली त्याला सकारात्मक कर्तव्याचा भाग म्हणून सपकाळ यांनी घेऊन आपल्या सेवेला सुरवात केली. 

हेही वाचा - हृदयद्रावक सुखी संसार अचानक विस्कटला अन् विवाहितेसह दोन चिमुकल्यांनी विहिरीत...

या दरम्यान या वॉर्डातील प्रसूती विभागातील गरोदर स्त्रिया व छोटछोट्या बालक बालिकांना जीव लावत, त्यांची सेवा करीत स्वतःच्या सहा वर्षीय मुलापासून तब्बल छप्पन दिवस दूर असल्याच्या विरहावर उपाय शोधत असतात याचवेळी प्रसूती विभागात राजस्थान राज्यातून आलेली कोरोना संशयित महिला रुग्ण भरती झाली. 

त्यानंतर अनुराधा सपकाळ खिल्लारे व बाविस्कर त्यांनी तिचे बाळंतपण केले आणि प्रसूती यशस्वीपणे पार पडली व त्या महिलेने सुंदर अशा पुत्र रत्नमाला जन्म दिला कर्तव्यापायी स्वतःच्या मुलापासून दूर राहणार्‍या या कर्तबगार अधिपरिचरिकेचे समाजमाध्यमातून तालुका व परिसरात कौतुक केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Superintendent also fought 56​​days away from his own son in buldana district