esakal | स्क्रिनिंग झालेल्यांना घरपोच धान्याचा पुरवठा करा! - बच्चू कडू
sakal

बोलून बातमी शोधा

Supply homemade grain to screened people! - bacchu kadu

कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत बाहेर गावावरुन आलेल्या व्यक्तींमुळे समाजात गैरसमज पसरत आहे. अशा व्यक्तींना कोरोनाची लागण असल्याची अफवा सुद्धा काही नागरिक पसरवत आहेत. त्यामुळे इतरांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे बाहेर गावावरुन आलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना घरपोच धान्य पुरवठा करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिले आहेत.

स्क्रिनिंग झालेल्यांना घरपोच धान्याचा पुरवठा करा! - बच्चू कडू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या कुटूंबात बाहेरगावाहून (मुंबई, पुणे, यवतमाळ, नागपूर इ.) पाहूणे (व्यक्ती) आले असतील अशा कुटूंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरीत करण्यात येणारे धान्य घरपोच द्यावे. त्यासोबतच त्यांची वैद्यकीय पथकाने घरी जाऊन तपासणी करावी, असे निर्देश राज्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत. 

कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत बाहेर गावावरुन आलेल्या व्यक्तींमुळे समाजात गैरसमज पसरत आहे. अशा व्यक्तींना कोरोनाची लागण असल्याची अफवा सुद्धा काही नागरिक पसरवत आहेत. त्यामुळे इतरांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे बाहेर गावावरुन आलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना घरपोच धान्य पुरवठा करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिले आहेत.

त्यानुसार जिल्हा प्रशासन ही यंत्रणा राबवेल व गावोगावी तसेच शहरी भागातही होत असलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे घरपोच धान्य व वैद्यकीय सेवा पोहोचवेल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले आहे. हे धान्य त्या कुटूंबाच्या गरजेनुसार व प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येईल असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी पुरवठा विभागाला निर्देश दिले आहेत. यामागे त्या कुटूंबातील व्यक्तींनी बाहेर पडू नये हा उद्देश असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

loading image