धक्कादायक! हा तर रुग्णांच्या जीवाशी खेळ..येथे कोविड केअर सेंटरमध्ये शिळ्या अन्नाचा पुरवठा.. वाचा काय आहे प्रकार 

Supply of stale food in Gondia districts Covid care center
Supply of stale food in Gondia districts Covid care center

मुंडीकोटा (जि. गोंदिया) : सरांडी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या निवासी शाळेत कोविड केअर सेंटर आहे. येथे रुग्णांना राहण्याची सोय केली आहे. या केंद्रात 7 रुग्णासह बालकांचादेखील समावेश आहे. साधे मास्कदेखील त्यांना पुरविण्यात आले नाही. बालकांचा कोणताच विचार करण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

तिरोडा तालुक्‍यातील सरांडी येथील कोविड केअर सेंटरमधून रुग्णांना शिळ्या अन्नाचा पुरवठा जात जात असल्याचा प्रकार गुरुवारी (ता.6) उघडकीस आला आहे. पोळ्या वाळलेल्या अवस्थेत दिसून आल्या. रुग्णांच्या आरोग्याशी होत असलेला हा खेळ थांबवावा, अशी मागणी होत आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांचा काय उपयोग? 

एका रुग्णाने डोके दुखत असल्याचे सांगितले असता त्यांना साधी डोके दुखण्याची गोळी दिल्या जात नसेल तर तिथे आरोग्य कर्मचाऱ्यांचा काय उपयोग? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. उल्लेखनीय म्हणजे, या कोविड केअर केंद्रात रुग्णांना निकृष्ट जेवण दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोना रुग्णांना शिळे अन्न 

येथील रुग्णांना गुरुवारी (ता.6) शिळे अन्न देण्यात आले. भात अतिशय निकृष्ट तर, पोळ्या वाळलेल्या अवस्थेत आढळून आल्या. दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने या प्रकाराची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

केअर नव्हे कोरोना फैलवणारे सेंटर

बाहेरील जिल्हा व राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांपासून कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून अशा नागरिकांना क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. मात्र, काही सेंटरमध्ये अस्वच्छतेने कळस गाठला आहे. कुठे जेवणात निकृष्टपणा तर कुठे घाणीचे साम्राज्य अशी अवस्था सेंटरची आहे. गोंदियाला लागून असलेल्या मुर्री येथील सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळा असलेल्या वसतिगृहातील क्वॉरटांइन सेंटरमध्ये सुविधांचा अभाव असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. शौचालय आणि प्रसाधनगृृहाची अवस्था अतिशय बिकट आहे. महिला व पुरुषांसाठी स्नानगृहसुद्धा एकच उपलब्ध करून देण्यात आले आहे.


वस्तुस्थिती जाणून घेऊन अन्न पुरवठा कंत्राटदारावर कारवाई केली जाईल. शक्‍य झाल्यास त्याला बदलविण्यात येईल.
डॉ. हिंमत मेश्राम, 
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, तिरोडा.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com