१५० किलो वजनी मनुष्यावर शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

नागपूर - लठ्ठपणावर बॅरियाट्रिक सर्जरीचा लाभ केवळ श्रीमंत व्यक्तींनाच होतो, हा समज आता दूर झाला असून मेडिकलमध्ये सर्वसामान्य व्यक्तींना या सुविधांचा लाभ मिळत आहे. शनिवारी १५० किलो वजनाच्या व्यक्तीवर शस्त्रक्रिया करून वजन कमी करण्यात आले. आता या व्यक्तीचे वजन ८० ते ९० किलो असल्याचे कार्यशाळेच्या समारोपीय सोहळ्यातून सांगण्यात आले.

शनिवारी मेडिकलचा सर्जरी विभाग व असोसिएशन ऑफ सर्जनच्या वतीने बॅरियाट्रिक सर्जरी या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. उद्‌घाटन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या हस्ते झाले. इंदूर येथील बॅरियाट्रिक सर्जन डॉ. मोहित भंडारी, मेडिकलचे बॅरियाट्रिक सर्जन डॉ. राज गजभिये, संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश सिंघानिया, सचिव डॉ. सुशील लोहिया, मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेश गोसावी, डॉ. वासुदेव बारसागडे, डॉ. ए. कुरेशी उपस्थित होते. डॉ. मोहित भंडारी यांच्यासह डॉ. राज गजभिये यांनी शनिवारच्या कार्यशाळेत पाच लठ्ठ व्यक्तींवर शस्त्रक्रिया करून वजन कमी केले. सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. डॉ. निसवाडे यांनी शासकीय रुग्णालयात ही महागडी शस्त्रक्रिया अल्पखर्चात उपलब्ध करून दिली. 

शरीराचा उत्कांत काळ, जनुकीय बदल, संप्रेरकांचे असंतुलन हे लठ्ठपणास निमित्त ठरतात. मात्र, जीवनशैली व आहारशैली ९० टक्के कारणीभूत ठरत आहे, याकडे आमचे लक्ष नाही. आहारात कोणत्या गोष्टीचा समावेश करावा, खाण्याचे प्रमाण किती असावे यावर नियंत्रण ठेवल्यास लठ्ठपणावर नियंत्रण ठेवता येते.
- डॉ. मोहित भंडारी, बॅरियाट्रिक सर्जन, इंदूर

लठ्ठपणामुळे मधुमेहाची जोखीम वाढते. लठ्ठपणा व मधुमेहामुळे कॅन्सरचीही जोखीम वाढते. लठ्ठपणामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट, गर्भाशय तसेच इतर कॅन्सरची जोखीम २० टक्‍क्‍यांनी वाढते. पुरुषांमध्येही लठ्ठपणामुळे प्रोस्टेट, फुप्फुस कॅन्सरचा धोका वाढतो. 
- डॉ. राज गजभिये, विभागप्रमुख, सर्जरी विभाग, मेडिकल.

Web Title: Surgery on men weight 150 kg

टॅग्स