आश्‍चर्य! टेलिफोनच्या खांबावर पेटला विजेचा दिवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

टेकाडी (जि. नागपूर) : टेलिफोनच्या जुन्या खांबात वीजपुरवठा प्रवाहित झाल्याने मोठा अनर्थ जरी टळला असला तरी नागरिकांनी या खांबावर विजेचा दिवा पेटवून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा निदर्शनास आणून दिला. टेकाडी गावात या घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी रोष निर्माण झाला आहे.

टेकाडी ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावात एलईडी लाइट लावण्याचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी हनुमान मंदिर आवारात लावण्यात आलेल्या बीएसएनएलचा बंद खांब आहे. या खांबाचा वापर ग्रामपंचायत लाइट लावण्यासाठी करीत आहे. शुक्रवारी दुपारी एलईडी लाइट लावण्यात आले. सायंकाळी स्ट्रीट लाइट सुरू करण्यात आल्यानंतर या विजेच्या खांबात वीज प्रवाहित झाली. एका मुलाचा हात चुकून खांबाला लागला, त्याला विजेचा धक्का लागल्याने त्याने ही माहिती आसपासच्या लोकांना दिली. सुदैवाने मोठा अनर्थ घडला नाही. मात्र, त्याच्यावर अनेकांचा विश्वास बसला नाही. ग्रामस्थांनी खांबाला टेस्टर लावून बघताच खांबात वीजपुरवठा होत असल्याचे समोर आले. काहींनी खांबावर चक्क लाइट लावूनच ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षितपणाची पोलखोल केली.
संतप्त नागरिकांनी ताबडतोब महावितरण व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सूचना दिली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून खांबावर लावलेले एलईडी लाइटचे कनेक्‍शन बंद केले. खंबावरील वीज पुरवठा खंडित झाल्याचे तपासल्यानंरच ग्रामस्थांनी सुटकेचा श्‍वास घेतला. मात्र, या घटनेनंतर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surprise! Light the belly on the telephone poles