गडचिरोलीत पाच जहाल नक्षलवाद्यांची शरणागती 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

नक्षलवाद्यांत जग्गू ऊर्फ जयराम कोमटी गावडे, रासो ऊर्फ देवे झुरू पुंगाटी, सुशीला ऊर्फ सन्नी बुस्कू पुंगाटी, रैजी ऊर्फ भारत ऊर्फ कोरसा ऊर्फ अनिल बुधू गावडे व कमलेश लच्छू तेलामी यांचा समावेश आहे.

गडचिरोली : सहा लाखांचे बक्षीस असलेल्या एरिया कमिटी सदस्यासह एकूण 16 लाखांचे बक्षीस असलेल्या 5 जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे शरणागती पत्करली.

नक्षलवाद्यांत जग्गू ऊर्फ जयराम कोमटी गावडे, रासो ऊर्फ देवे झुरू पुंगाटी, सुशीला ऊर्फ सन्नी बुस्कू पुंगाटी, रैजी ऊर्फ भारत ऊर्फ कोरसा ऊर्फ अनिल बुधू गावडे व कमलेश लच्छू तेलामी यांचा समावेश आहे. जग्गू गावडे प्लाटून क्रमांक 14 चा एसीएम सदस्य होता. 2007 मध्ये तो भामरागड दलामध्ये भरती झाला. त्यानंतर भामरागड मिलीशिया कमांडर व प्लाटून क्रमांक 14 चा एसीएम सदस्य झाला.

बेजूरपल्ली, येर्रागुडा, तोंडेर येथील चकमकी, लाकडांच्या बिटांची जाळपोळ, खून अशा 17 गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्याच्यावर 6 लाखांचे बक्षीस होते. 

Web Title: surrender of five naxalites in Gadchiroli