जहाल महिला नक्षलवाद्याची शरणागती; होते सहा लाखांचे बक्षीस

शरणागत जहाल महिला नक्षलवाद्याचा सत्कार करताना पोलिस अधीक्षक गोयल व इतर मान्यवर
शरणागत जहाल महिला नक्षलवाद्याचा सत्कार करताना पोलिस अधीक्षक गोयल व इतर मान्यवर

गडचिरोली : हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. सहा लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल महिला नक्षलवादीने बुधवारी (ता. २३) पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. शशिकला ऊर्फ गुनी ऊर्फ झुरी ऊर्फ अंजु आसाराम आचला असे शरणागती पत्करणाऱ्या जहाल महिला नक्षलवाद्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर एका कार्यक्रमात तिने शरणागती पत्करली. (Surrender-of-women-Naxalites-in-Gadchiroli)

शशिकला ऊर्फ गुनी ऊर्फ झुरी ऊर्फ अंजु आसाराम आचला (वय ३०, रा. मोठा झलीया पोमके गॅरापत्ती, ता. धानोरा, जि. गडचिरोली) ही डिसेंबर २००६ रोजी टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाली होती. सध्या टिपागड एलओएसमध्ये एसीएम पदावर ती कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे १५, जाळपोळ १ व इतर ४ असे एकूण २० गुन्हे दाखल आहेत. तसेच तिच्यावर शासनाने ६ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.

शरणागत जहाल महिला नक्षलवाद्याचा सत्कार करताना पोलिस अधीक्षक गोयल व इतर मान्यवर
शहीद भूषण सतई यांच्या वडिलांची गळफास लावून आत्महत्या

गडचिरोली पोलिस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे २०१९ ते २०२१ मध्ये एकूण ३९ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये ४ डीव्हीसी, २ दलम कमांडर, ३ उपकमांडर, २९ सदस्य व १ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. गडचिरोली पोलिस दलाने जिल्हाभरात आदिवासी बांधवांसाठी घेतलेले जनजागरण मेळावे, रोजगार मेळावे, महिला मेळावे, ग्रामभेटी तसेच जे तरुण-तरुणी नक्षलमध्ये भरती झाले आहेत, त्यांच्या घरी जाऊन पोलिसांनी त्यांना सुखी जीवनाचे महत्त्व पटवून दिले होते.

बुधवारी नवजीवन वसाहत येथे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते नवजीवन वसाहत बोर्डचे प्रकाशन, वृक्षारोपण व आत्मसमर्पण कल्याण कार्डचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विकासाच्या मुख्य प्रवाहात आलेली शशिकला ऊर्फ गुनी तिचा पोलिस अधीक्षकांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया, अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक अहेरी सोमय मुंडे उपस्थित होते.

(Surrender-of-women-Naxalites-in-Gadchiroli)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com