नागपूर : अपत्यामागे सहा लाखांचा व्हायचा सौदा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

आरोपी हर्षा मुंदडा होती सरोगेट मदर; मोठा खुलासा होण्याची शक्‍यता
नागपूर - मध्यस्थ असलेले दाम्पत्य व सरोगेट मदर यांच्यात सहा लाखांचा सौदा व्हायचा. करारावर संबंधित महिलेची स्वाक्षरी घेण्यात येत होती. मात्र, करार महिलेला दिला जात नव्हता, अशी माहिती आरोपी मनीष मुंदडाने दिल्याचे पोलिससूत्रांनी सांगितले.

नंदनवन झोपडपट्टीमधील १३ महिलांनी सरोगेट मदर प्रकरणात १४ लाखांनी फसवणूक केल्याची तक्रार नंदनवन पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी शहरातील काही डॉक्‍टर आणि मध्यस्थ मनीष आणि हर्षा मुंदडा यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. मुंदडा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली.
मुंदडा दाम्पत्य गरीब व घटस्फोटीत महिलांना सरोगसीसाठी प्राधान्य देत होते. त्यांना नऊ महिने मुंदडाच्या ‘शेल्टर होम’मध्ये ठेवण्यात येत होते. तेथे गर्भवतींना आवश्‍यक सुविधा दिली जात नव्हती. 

करारानुसार अर्धी रक्‍कमही मुंदडा दाम्पत्य महिलांना देत नव्हते. मनीष महिलांना  शिवीगाळ व मारहाणही करायचा. त्यांना ठार मारण्याच्या व मुलींना विकण्याच्या धमक्‍या देत असल्याचा महिलांचा आरोप आहे. या प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.

अनेक महिला मनीषच्या संपर्कात
मनीषची पत्नी हर्षाही सरोगेट मदर आहे. मनीषने काही महिलांचे पासपोर्टही तयार केले होते. त्यावरून तो काही महिलांना दुबईत पाठविणार होती. आंध प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड या राज्यातील काही महिला मनीषच्या संपर्कात होत्या. मनीषचा महाराष्ट्रातीलही मोठ्या शहरातही  अन्य मध्यस्थांशी संपर्क होता. मनीषने आतापर्यंत काही शासकीय आणि निमशासकीय सेवेत असलेल्या बड्या अधिकाऱ्यांना सरोगरीद्वारे अपत्यप्राप्ती करून दिली आहे.

Web Title: surrogate mother baby deal six lakh crime