सरोगेट माता प्रकरणातून चार डॉक्‍टरांवर गुन्हे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

नागपूर - गरीब महिलांना सरोगेट मदर होण्यासाठी तयार करून त्यांची आर्थिक  फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी या प्रकरणातील मध्यस्थ दाम्पत्यासह चार डॉक्‍टरांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी मनीष सूरजरतन मुंदडा (३२, रा. नंदनवन)  आणि हर्षा मनीष मुंदडा या दाम्पत्याला अटक केली असून, यांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

नागपूर - गरीब महिलांना सरोगेट मदर होण्यासाठी तयार करून त्यांची आर्थिक  फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी या प्रकरणातील मध्यस्थ दाम्पत्यासह चार डॉक्‍टरांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी मनीष सूरजरतन मुंदडा (३२, रा. नंदनवन)  आणि हर्षा मनीष मुंदडा या दाम्पत्याला अटक केली असून, यांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

नैसर्गिकरित्या अपत्य होण्याची शक्‍यता नसलेल्या दाम्पत्याला सरोगसी पद्धतीने अपत्य होऊ शकते. यासाठी त्रयस्थ महिलेच्या गर्भाशयात बाळाची वाढ केली जाते. संबंधित महिलेला याचा मोबदला दिला जातो. गर्भाशयात बाळ वाढविण्यासाठी राजी होणाऱ्या महिलेशी यासाठी करार  केला जातो. ही संपूर्ण प्रक्रिया खर्चिक असल्यामुळे सधन दाम्पत्यच अपत्यप्राप्तीसाठी या पद्धतीचा वापर करू शकतात. अशा प्रकरणांमध्ये मध्यस्थ असलेले मुंदडा दाम्पत्याने पैसे कमावण्याच्या उद्देशाने सरोगसी प्रक्रियेसाठी महिला उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय सुरू केला, असे  पोलिसांनी सांगितले. यासाठी हे दाम्पत्य घटस्फोटित वा कुटुंबापासून विभक्‍त महिलांचा शोध घेत असे. 

सरोगेट मदरने बाळाला जन्म देताच ते संबंधित कुटुंबाला दिले जात होते. परंतु, नंदनवन परिसरातील १३ महिलांनी करारानुसार १४ लाख रुपये मिळाले नसल्याची रीतसर तक्रार नंदनवन पोलिस ठाण्यात केली. या तक्रारीवरून पोलिसांनी चार डॉक्‍टरांसह सहा जणांवर गुन्हे दाखल करत मुंदडा दाम्पत्याला अटक केली आहे. चौकशीत या साखळीतील इतर नावे पुढे येण्याची शक्‍यता आहे.

मनीष गुन्हेगारी प्रवृत्तीचा
मनीष मुंदडा हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच्यावर नंदनवन आणि उमरेड पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. पत्नी हर्षा हिला तो घटस्फोटित तसेच गरीब महिलांचा शोध घ्यायला सांगत होता. प्रत्येक निपुत्रिक दाम्पत्याकडून  ५ ते ७ लाख रुपये घेऊन डॉक्‍टरांनी आतापर्यंत कोट्यवधींची कमाई केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सरोगसीसाठी तयार झालेल्या महिलांना मात्र तो करारात ठरल्यापेक्षा कमी पैसा देत असे.

सरोगेट मातांच्या जीवाशी खेळ
करारानुसार सरोगेट मातांच्या वैद्यकीय चाचणीपासून ते आहाराची काळजी घेणे आवश्‍यक असते. मात्र, मनीष आणि हर्षा त्यांना दर महिन्याला खर्चासाठी फक्त चार ते पाच हजार रुपये देत होते.  या महिलांना कराराची प्रतही देण्यात येत नव्हती. प्रसूती झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बाळ  संबंधित दाम्पत्याला दिल्यानंतर महिलांना रुग्णालयातून सुटी देण्यात येते.

Web Title: surrogate mother case doctor crime