पाळणाघरे कागदोपत्री

राज इंगळे
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

अचलपूर(अमरावती) : मेळघाटातील चिखलदरा, धारणी या दोन्ही तालुक्‍यात जवळपास 35 पाळणाघरे कागदावर सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर दोन्ही तालुक्‍यांपैकी चिखलदरा तालुक्‍यात सुरू असलेल्या दहा पाळणाघरांपैकी एकही पाळणा घर सुरू नसल्याची माहिती चिखलदरा अधिकाऱ्यांच्या चौकशीमध्ये समोर आले आहे. त्यामुळे सदर पाळणाघरे मेळघाटात कागदोपत्री सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे

अचलपूर(अमरावती) : मेळघाटातील चिखलदरा, धारणी या दोन्ही तालुक्‍यात जवळपास 35 पाळणाघरे कागदावर सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर दोन्ही तालुक्‍यांपैकी चिखलदरा तालुक्‍यात सुरू असलेल्या दहा पाळणाघरांपैकी एकही पाळणा घर सुरू नसल्याची माहिती चिखलदरा अधिकाऱ्यांच्या चौकशीमध्ये समोर आले आहे. त्यामुळे सदर पाळणाघरे मेळघाटात कागदोपत्री सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे
बालकांचे आरोग्य चांगले राहावे, देश कुपोषण मुक्त व्हावा, बालकांचा शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा व बालकांचे परिपूर्ण संगोपन पाळणाघर केंद्रात व्हावे हा मुख्य उद्देश या योजने मागचा होता. मात्र मेळघाटात पाळणाघर कागदोपत्री उरले असल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एका संस्थेने धारणी चिखलदऱ्यासह तब्बल 27 ठिकाणी पाळणाघरे सुरू केल्याचे कागदोपत्री दिसून येत आहे. पैकी सदर संस्थेचे चिखलदरा तालुक्‍यात एकही पाळणाघर सुरू नसल्याचे चिखलदरा आयसीडीयस विभागाने केलेल्या चौकशीत आढळून आले, तर धारणी तालुक्‍यात तपासणी सुरू असल्याची माहिती देण्यात आली. सोबतच अचलपूर तालुक्‍यातील भंडराज येथील संस्थेनेही चिखलदरा तालुक्‍यातील दोन गावांत पाळणाघर सुरू केले आहे. मात्र या संस्थेचेही एकही पाळणाघर सुरू नाही अशीच स्थिती जिल्ह्यात इतर ठिकानी सुरू असलेल्या संस्थेच्या पाळणाघराची असल्याची दाट शक्‍यता आहे. करिता जिल्ह्यात सुरू असलेल्या पाळणाघरांची सखोल तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात कार्यरत संस्था व पाळणाघर संख्या
चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय ग्रामीण आदिवासी विकास संस्था 27, पुणे जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्ट 3, तर अमरावती जिल्ह्यातील मातृछाया सोशल वेलफेअर सोसायटी भंडारज 2, सहचालिका संस्था राजुरा बाजार 1, जगदंबा एज्युकेशन सोसायटी अचलपूर 2, लिबरल फ्रेंड असोशियशन अमरावती 4, रोशनी महिला विकास संस्था अंजनगाव 1, ब्रिज फाउंडेशन परतवाडा 4, विदर्भ बहूद्देशीय विकास संस्था आष्टगाव 4, अशा जिल्ह्यात नऊ संस्था कार्यरत असून पाळणाघरांची संख्या 48 आहेत.

जिल्ह्यात सुरू असलेली पाळणाघरे
धारणी 25, चिखलदरा 10, अचलपूर-परतवाडा 9, अमरावती 1, वरुड 2, अंजनगाव सुर्जी 1,

तालुक्‍यात सुरू असलेले पाळणाघरांची तपासणी केली असता तालुक्‍यात कागदोपत्री दाखविण्यात आलेल्या एकही गावात पाळणाघर सुरू नसल्याचे दिसून आले. त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे
-विलास दुर्गे, बालविकास अधिकारी चिखलदरा.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surveillance documents