युवा अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नागपूर : मित्राच्या घरी पाहुणा म्हणून आलेला युवा अभियंता क्षितिज रमेश उपरे (23) याचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. या संशयास्पद घटनेमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

नागपूर : मित्राच्या घरी पाहुणा म्हणून आलेला युवा अभियंता क्षितिज रमेश उपरे (23) याचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. या संशयास्पद घटनेमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षितिज नुकताच अभियंता झाला होता. बुधवारी कंपनीत त्याची मुलाखत होती. त्यासाठी तो बल्लारपूरहून नागपुरात आला. मुलाखत आटोपल्यानंतर त्याने मित्रासोबत पार्टी करण्याचा बेत आखला. त्यानुसार सक्करदरातील बुधवारी बाजार, बिंझाणी कॉलेजच्या गेटमागे राहणाऱ्या मित्राच्या खोलीवर क्षितिज गेला. तेथे आणखी चार मित्र जमले. पाच मित्रांनी बुधवारी रात्री दारू पिली. पार्टी आटोपल्यानंतर मध्यरात्री तिघे जण तिसऱ्या माळ्यावर जिन्याजवळ सिगारेट पीत गप्पा करीत बसले.
क्षितिजसोबत झोपलेला दुसरा तरुण रात्री 1.20 वाजता जागा झाला. त्याला क्षितिज दिसला नाही. त्यामुळे त्याने अन्य तिघांना विचारणा केली. त्यानंतर चौघेही जण क्षितिजचा शोध घेऊ लागले. जिन्यावरून खाली बघितले असता क्षितिज रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. त्यांनी लगेच त्याला मेडिकलमध्ये नेले. तेथे डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspected death of a young engineer