नवऱ्याऐवजी प्रियकरावर केले प्रेम अन्‌ झाला घात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

नेहमीप्रमाणे सकाळी शारदा ही कामावर जाण्यासाठी आपल्या घरून निघाली होती. मात्र, त्यादिवशी ती घरीच आली नव्हती. त्यामुळे तिचा पती अरविंदने तिच्या मैत्रिणीकडे शोध घेतला. परंतु, शारदा कुठेही सापडली नाही.

नागपूर : सर्वसाधारण कुटुंबातील बाहेरख्याली महिलेने नवऱ्याऐवजी एका व्यक्तीवर प्रेम केले. काही दिवस त्यांचे मधूर संबंध होते. मात्र, तिने अचानक या प्रियकराशी देखील दुरावा केला. त्याला सोडून ती आणखी तिसऱ्याच व्यक्तीसोबत संबंध प्रस्थापित केले. हा सर्व प्रकार प्रियकराच्या जिव्हारी लागल्याने त्या महिलेला मोठी किंमत चुकवावी लागली. वाचा संपूर्ण कहाणी.... 

शारदा अरविंद शिंदे (33, रा. चिंतामणीनगर, गिट्टीखदान) ही विवाहित महिला सिनेमॅक्‍स येथे नोकरी करीत होती. तिची तीन वर्षांपूर्वी प्रॉपर्टी डिलिंगचे काम करणाऱ्या चंद्रकांत वाणीसोबत (वय 47, रा. शुभारंभ सोसायटी) ओळख झाली होती. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही विवाहित असतानासुद्धा केवळ शारीरिक संबंधासाठी दोघांनी नात्यात राहण्यास पसंती दिली. दोघांचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. दरम्यान, शारदाचे अन्य एका युवकाशीदेखील प्रेमसंबंध निर्माण झाले. याचा संशय चंद्रकांतला होता. त्यामुळे त्यांच्यात अबोला होता. 

कुणाशीही प्रेमसंबंध नसल्याची कबुली 
29 नोव्हेंबर 2019 रोजी शारदाने चंद्रकांतला फोन करून माझे आता कुणाशीही प्रेमसंबंध नसल्याचे त्याला सांगितले होते. त्याचप्रमाणे तिने भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचदिवशी वाडी येथील मारुती सेवा येथे त्यांची भेट झाली. त्याचप्रमाणे आपण 2 डिसेंबरला भेटू, असे तिला सांगितले होते. त्यानुसार, 2 डिसेंबरला सकाळी सव्वासातच्या सुमारास शारदा ही वाडी बसथांबा येथे चंद्रकातला भेटली. तिला घेऊन तो सिनेमॅक्‍स येथे आला. शारदा ही सिनेमॅक्‍स येथे गेली आणि काही वेळातच परत आली.


 आरोपीसोबत पोलीस 

विहिरीत सापडला मृतदेह 
शारदाला घेऊन चंद्रकांत बुटीबोरीकडे गेला. बुटीबोरी ते उमरेड मार्गावरील मरसघाट शिवारातील मनसुखभाई पटेल यांच्या शेतात नेऊन त्याने कार थांबविली. त्याने तिला विहिरीजवळ नेले आणि तिला विहिरीत ढकलले. ती पाण्यात बुडत नसल्याचे पाहून चंद्रकांतने वरून तिच्या डोक्‍यावर दगड घातला. त्यानंतर चंद्रकांत आपल्या घरी निघून आला. 4 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 सुमारास बेंदुर्ली येथे राहणारा अंकुश परसराम पंधराम हा नेहमीप्रमाणे शेतात आला असता त्याला विहिरीत एका महिलेचा मृतदेह दिसला. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. 

पाडलं की हो! डॉन आंबेकरच्या चारमजली आलिशान बंगल्यावर बुलडोझर

गिट्टीखदानमध्ये मिसिंग दाखल 
नेहमीप्रमाणे सकाळी शारदा ही कामावर जाण्यासाठी आपल्या घरून निघाली होती. मात्र, त्यादिवशी ती घरीच आली नव्हती. त्यामुळे तिचा पती अरविंदने तिच्या मैत्रिणीकडे शोध घेतला. परंतु, शारदा कुठेही सापडली नाही. त्यामुळे अरविंदने दुसऱ्या दिवशी गिट्टीखदान पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी हरविल्याची नोंद घेऊन तपास सुरू केला. 

असा लागला छडा 
शारदा कामावर गेली की नाही, याचा तपास करण्यासाठी गिट्टीखदान पोलिसांनी व्हेरायटी चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात शारदा ही लाल रंगाच्या वॅगन आर कारमधून सिनेमॅक्‍स येथे गेली आणि काही वेळातच ती बाहेर आली. त्याच कारमध्ये बसून ती वर्धा मार्गाने गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी वर्धा मार्गावरील सीसी कॅमेरे तपासले असता कार ही हॉटेल प्राइडपर्यंत आल्याचे दिसून आले. त्यानंतर वर्धा मार्गावर एके ठिकाणी कारचा क्रमांक स्कॅन करण्यात आला. त्यात (एमएच 31 सीएन 4762) कारचा क्रमांक पोलिसांना मिळाला. पोलिसांनी आरटीओमधून कारमालकाचा शोध घेतला असता, ती कार विजय एकनाथ वाणी यांची असल्याचे लक्षात आले. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने विजय वाणी यांची भेट घेतली असता नमूद क्रमांकाची कार ही त्यांचीच असून ती कार त्यांचा भाऊ चंद्रकांत वाणी चालवीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुलीचे शाळेतून अपहरण करण्याची धमकी; उकळली नऊ लाखांची खंडणी

प्रियकराने दिली कबुली 
पोलिसांनी चंद्रकांतला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्याची सखोल चौकशी केली असता, शारदाला ओळखत असल्याचे त्याने सांगितले. शारदाचे अन्य युवकांसोबत संबंध असल्याच्या कारणावरून तिचा खून केला. तिची पर्स आणि ड्यूटीचे कपडे घटनास्थळापासून काही अंतरावर जाळून टाकले, असेही त्याने सांगितले. गिट्टीखदान पोलिसांनी बुटीबोरी पोलिसांशी संपर्क साधला असता, विहिरीत सापडलेला मृतदेह शारदाचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर चंद्रकांतला पुढील तपासासाठी बुटीबोरी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी पोलिस हवालदार युवराज ढोले, इमरान शेख, आशीष बावनकर यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suspence reveled of married women dead nagpur