विद्यार्थिनींसोबत अश्‍लील चाळे करणारा शिक्षक निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

धारणी (जि. अमरावती) - तालुक्‍यातील पाटीया येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींसोबत अश्‍लील चाळे करणारऱ्या शिक्षकास धारणी पंचायत समितीचे बीडीओ उमेश देशमुख यांनी निलंबित केले आहे. तसेच त्याच शाळेतील मुख्याध्यापकाची वार्षिक वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत. वरील प्रकारामुळे खळबळ उडाली असून, अनेक संघटनांनी शिक्षकांविरोधात उडी घेतली आहे. 

धारणी तालुक्‍यातील पाटीया जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत विषय शिक्षक प्रदीप चऱ्हाटे यावर्षी रुजू झाले. 

यापूर्वी ते धामणगाव येथे होते. पाटीया येथे रुजू झाल्यानंतर त्यांनी आपले कारनामे सुरू केले. या शाळेत एकूण ९ मुली आहेत. विषय शिक्षकाने अश्‍लील चाळे शाळेतच केल्याचे विद्यार्थिनींनी आपल्या बयानात सांगितले. या प्रकाराची तक्रार बीडीओ उमेश देशमुख यांच्याकडे येताच त्यांनी तत्काळ दखल घेतली.

तसेच चौकशीसाठी गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांना शाळेत पाठविले. संबंधित प्रकार आपल्यासोबत होत असल्याचे विद्यार्थिनींनी त्यांना सांगितले. शिक्षक प्रदीप चऱ्हाटे याला तत्काळ निलंबित करण्यात आले. तर मुख्याध्यापक नंदू बठकर यांची वार्षिक वेतनवाढ थांबविल्याचे आदेश बीडीओंनी काढले.

यासंदर्भात युवक काँग्रेसचे महासचिव पंकज मोरे यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामध्ये केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांना निलंबित करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Suspended teacher with sexually abused student in amravati