रेल्वेस्थानकावर संशयास्पद वाहने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नागपूर : दीर्घ कालावधीपासून रेल्वेस्थानकांवर उभ्या असणाऱ्या संशयास्पद वाहनांसंदर्भात कारवाईसाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून देशभरात "ऑपरेशन नंबरप्लेट' राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत नागपूर विभागात 56 वाहने आढळून आली असून ती संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत.

नागपूर : दीर्घ कालावधीपासून रेल्वेस्थानकांवर उभ्या असणाऱ्या संशयास्पद वाहनांसंदर्भात कारवाईसाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून देशभरात "ऑपरेशन नंबरप्लेट' राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत नागपूर विभागात 56 वाहने आढळून आली असून ती संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत.
रेल्वेस्थानकांच्या पार्किंगमध्ये अनेक वाहने मोठ्या कालावधीपासून उभे आहेत. चोरी किंवा अन्य गुन्हेगारी घटनांमध्ये वाहनांचा उपयोग करून लपविण्याच्या दृष्टीने ती पार्किंगमध्ये उभी करून ठेवली असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. ही वाहने चोरीचीसुद्धा असण्याची दाट शक्‍यता आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीनेही असे वाहन धोक्‍याचे ठरू शकते. यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकांकडून देशभरात ऑपरेशन नंबरप्लेट राबविण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याअंतर्गत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने महत्त्वपूर्ण रेल्वेस्थानकांवर हे ऑपरेशन राबविण्यात आले. 9 ते 12 ऑगस्टदरम्यान पाच दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून उभ्या असणाऱ्या वाहनांची झाडाझडती घेण्यात आली. विभागात एकूण 56 संशयास्पद वाहने आढळून आली. पार्किंग कंत्राटदाराकडे कोणतीही माहिती नसलेले वाहन संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याशिवाय नो पार्किंग झोनमध्ये उभी 10 वाहने जप्त करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित वाहनचालकांकडून प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांनी दिला आहे.
आता डीआरएम कार्यालयातील वाहनांवर कारवाई
नियमित प्रवासी एक किंवा दोनच दिवसांसाठी वाहन पार्किंमध्ये ठेवतात. या वाहनांबाबत कुणालाच माहिती नाही. मोठ्या कालावधीपासून उभी वाहने धोक्‍याची ठरू शकतात. यामुळेच खबरदारी म्हणून नंबरप्लेट ऑपरेशन राबविण्यात आले. पुढच्या टप्प्यात डीआरएम कार्यालयात दीर्घ कालावधीपासून उभ्या वाहनांवरसुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचे भवानी शंकर नाथ यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspicious vehicles at the railway station