सौंडर्सच्या सुरयची यवतमाळात नोंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

यवतमाळ : दैनंदिन पक्षी निरीक्षणासाठी गुरुवारी (ता. 11) बेंबळा धरणावर दोन सुरय पक्षी बसलेले आढळून आले. निरीक्षणाअंती पांढरे अर्धगोलाकार डोळ्याच्या समोरपर्यंत कपाळ, चोच व पाय नारिंगी पिवळे यावरून तो सौंडर्सचा सुरय आहे, हे स्पष्ट झाले, अशी माहिती प्राणिशास्त्राचे प्रा. डॉ. प्रवीण जोशी व डॉ. दीपक दाभेरे यांनी दिली. त्यांच्यामते या सुरयची जिल्ह्यातील ही पहिलीच नोंद आहे.

सौंडर्सचा सुरय ज्याला इंग्रजीत "सौंडर्सच टर्न' व शास्त्रीय भाषेत स्टरना सौंडर्ससी असे संबोधतात. हा पक्षी आयूसीनच्या सूचित लिस्ट कर्न्सन या वर्गवारीत मोडत असला तरी महाराष्ट्रात याची नोंद क्वचितच आहे व विदर्भात यापूर्वी असेलच असे सांगता येत नाही. सौंडर्सचा सूरय मुख्यत: हा समुद्री किनारे, लहान बेटे व खाडी प्रदेशात भारतीय उपखंडात शीतऋतुदरम्यान वास्तव्यास असतो. परंतु, विणीच्या हंगामानंतर महाराष्ट्रातून परतीच्या प्रवासादरम्यान त्याची नोंद झाली. त्यामुळे ती दुर्मीळच आहे, यात शंका नाही, असेही प्रा. जोशी यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suyar of Soundar recorded in Yavatmal