स्वाभिमानी आक्रमक; एसटीची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

बुलडाणा : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेगाव येथे गेल्या आठवडाभरापासून तुर उत्पादक शेतकऱ्यांचे एक हजार रुपये अनुदान बँक खात्यात जमा करण्यासाठी उपोषण सुरू आहे. या उपोषणकर्त्यांची प्रशासनने दखल न घेतल्याने पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर आज (ता.1) आंदोलन करत प्राथमिक माहितीप्रमाणे तीन बसेसचे नुकसान करण्यात आले आहे.

शेगाव खरेदी विक्री संघ व नाफेडकडून शेगाव तालुक्यातील 1500 च्या वर शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न प्रलंबित आहे. यासंदर्भात अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा करा या मागणीसाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर सह शेकडो शेतकऱ्यांचे उपोषण सुरू केले.

शासन उपोषणाची दखल घेत नसल्याने शेतकरी झाले संतप्त होत आज एसटी बसची तोडफोड केली आहे. यात जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ फाट्यावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी एसटी शेगाव आगाराची भेंडवळ येथून जळगाव जामोदकडे जाणारी एमएच 40 एन 8055 क्रमांकाची बस संतप्त झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सकाळी 6 वाजेदरम्यान तोडफोड केली  आहे. याप्रकरणी पोलिस व एसटी प्रशासन घटनास्थळी रवाना झाले आहे. याशिवाय जिल्ह्यात उर्वरीत दोन ठिकाणीही बसचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे परंतु, त्याबाबत माहिती मिळू शकली नाही

Web Title: Swabhimani shetkarni sanghatana becomes violent on farmers issue