भ्रष्टाचारावरून घमासान 

file photo
file photo

अमरावती : राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील वाढत्या अनियमिततेच्या मुद्यावरून संतप्त झालेल्या सदस्यांनी सोमवारी (ता.11) जिल्हापरिषदेच्या आमसभेत चांगलाच "राडा' केला. यावेळी सदस्यांनी सभागृहात "सकाळ'चे अंक सुद्धा झळकविले. विशेष म्हणजे "सकाळ'ने राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील अनियमितता चव्हाट्यावर आणली असून त्याचीच दखल जिल्हापरिषदेत घेण्यात आली.
राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेत जिल्ह्यातील 40 प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच 145 आरोग्य उपकेंद्रांना रंगरंगोटी तसेच दुरुस्तीसाठी जवळपास 22 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून रंगरंगोटीची कामे करणे अपेक्षित असताना या अभियानाच्या मुळ उद्देशाला हरताळ फासून सुस्थितीत असलेल्या आरोग्य केंद्राची दुरुस्ती तसेच रंगरंगोटी करण्यात येऊन देयके काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या ठिकाणी गरजच नव्हती अशा आरोग्य केंद्रांमध्ये सुद्धा रंगरंगोटी करण्यात आल्याचे दाखविण्यात आले, असा आरोप प्रकाश साबळे, प्रवीण तायडे तसेच अन्य सदस्यांनी केला, याशिवाय पथ्रोट तसेच अन्य प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निर्लेखनाच्यावेळी जुने साहित्य सुद्धा परस्पर विकून टाकण्यात आल्याचा आरोप प्रवीण तायडे यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात अधिकारी तसेच कंत्राटदारांचे साटेलोटे असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली. विशेष म्हणजे आरोग्य मिशनमधील अनियमितेतसंदर्भात "सकाळ'ने 5 नोव्हेंबरला वृत्त प्रकाशित करून हा घोळ समोर आणला होता. 
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आमसभेला सुरवात होताच सदस्य प्रकाश साबळे व भाजपचे गटनेते प्रवीण तायडे यांनी "सकाळ'चा अंक झळकवून प्रशासनाला धारेवर धरले. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनविले. सभागृहात आरोग्य मिशनच्या झालेल्या घोळाबाबतचा वाद वाढतच गेला आणि अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी सभा स्थगित केली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी श्री. साबळे व प्रवीण तायडे यांनी लावून धरली. 

अध्यक्षांनी गुंडाळली सभा
सुहिसीनी ढेपे यांनी शिरजगाव कसबा प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वर्ग 3 व 4 च्या कर्मचारी निवासस्थान बांधकामाकरिता 3 कोटी ऐवजी 4 .80 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या मुद्यावरून सभागृहात गदारोळ केला. प्रशासनाकडून या कामांना अनुमोदनच दिले नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित करताच अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी सभा गुंडाळली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com