पेढ्यात गुंगीचे औषध देऊन मुलीचे अपहरण ; महिलेला अटक

शाहिद अली
मंगळवार, 27 मार्च 2018

पवनी (भंडारा) : पेढ्यात गुंगीचे औषध देऊन देह व्यापारासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला पवनी वासियानी चांगलाच चोप दिला आहे. याप्रकरणी आरोपी नुसरत रोजेखाँ (35) या महिलेस पोलिसांनी काल (ता.26) रोजी अटक केली असून, यामध्ये मोठी साखळी असू शकते.

आरोपी महिला यानी पीडित वसतिगृहात राहणाऱ्या १० वीचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला पवनी शहरात ता.२४ वसतिगृहात राहणाऱ्या १० वीचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन तिचे अपहरण करण्याची घटना उघडकीस आली आहे. 

मुलगी २४ मार्चला दुपारी कामानिमित्त वसतिगृहातून बाहेर पडल्यावर आरोपी महिलेने तिला प्रसाद म्हणून पेढा दिला. त्यामध्ये गुंगीचे औषध मिळवल्याने अल्पवयीन मुलगी बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपी नुसरत खान हिने तिचा साथीदार आरोपी आझाद खानच्या मदतीने मुलीचे अपहरण केले. दोन्ही आरोपी पीडित मुलीला एका कारमधून चंद्रपुरच्या भद्रावती तालुक्यातील खांबाडा गावी घेऊन गेले. त्याठिकाणी आरोपी खान याने सदर मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता मुलीने आरडाओरड करत डांबून ठेवलेल्या घरातून पळ काढला.

त्यानंतर शेजारील तिच्याच वयाच्या एका मुलीला पीडितेने आपले अपहरण झाल्याचे सांगितले. तिच्याच मदतीने पीडित मुलीने तिच्या पालकांना फोन करत अपहरण झाल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी मुलीला पवनी शहरात आणल्यावर त्यांनी पवनी पोलिसांत तक्रार दिली.

काही काळानंतर आरोपी महिला पीडित मुलीला पवनी गावतच दिसली. त्यावेळी पीडित मुलीने आजुबाजूच्या गावकऱ्यांना एकत्र करत आरोपी महिलेला बेदम चोप दिला. त्यानंतर आरोपी महिलेला पवनी पोलिसांकडे सोपविण्यात आले. याप्रकरणी आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली असून फरार आरोपी आझाद खान याचा शोध पोलिस घेत आहेत.

Web Title: Sweet Unconsious Girl have been Kidnapped Women Arrested