esakal | पुरात स्विफ्ट कार वाहून गेली; दोघे बचावले
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पुरात स्विफ्ट कार वाहून गेली; दोघे बचावले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

एकोडी ( भंडारा) : जवळच्या चांदोरी येथील नाल्यावरील पुरातून स्विफ्ट कार वाहन गेली. त्यातील दोघांनी प्रसंगावधान राखून गावकऱ्यांच्या मदतीने आपला जीव वाचविला. यामुळे जीवित हानी टळली आहे.
साकोली तालुक्‍यात सोमवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. वैनगंगा शिक्षण संस्थेचे संचालक ब्राम्हानंद करंजेकर यांची सकाळी किन्ही येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्याकरिता त्यांचे कार्यकर्ते देवचंद चांदेवार व मुन्ना करंजेकर स्विफ्ट कारद्वारे आले. सभेनंतर ते दोघेही सोनेगाव येथे जात होते. परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे चांदोरी येथील नाल्यावरून पुराचे पाणी वाहत असताना त्यांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने पुलावरून कार वाहून गेली.
दरम्यान, कारधील दोघांनी कारमधून उड्या मारून आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एकजण पोहून दुसऱ्या काठावर गेला तर, दुसरा पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जाऊन झुडपाला अडकला. नंतर तो झाडावर चढून बसला. यावेळी परिसरात असलेले चांदोरी व एकोडी येथील युवा शेतकरी व मासेमारांनी दोराच्या सहाय्याने त्याला पुरातून बाहेर काढले. यामुळे कार वाहन गेली असली तरी, या घटनेत जीवित हानी टळली आहे.

loading image
go to top