स्वाइन फ्लूमुळे 44 जण दगावले

स्वाइन फ्लूमुळे 44 जण दगावले

नागपूर : सध्याचे वातावरण स्वाइन फ्लूसाठी पोषक आहे. मध्य प्रदेशातील 45 रुग्णांसह पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये 385 स्वाइन बाधितांची नोंद झाली असून, यातील 44 जण दगावले आहेत. विशेष असे की, सर्वाधिक मृत्यू हे खासगी रुग्णालयात झाले आहेत. स्वाइन फ्लूसह इतर संसर्गजन्य आजारासाठी सार्वजनिक आरोग्य विभागात तसेच नागपूर महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे, असा गाजावाजा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात संसर्गरोगाचा प्रकोप सुरूच आहे. 
पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि गोंदियात यावर्षी पावसाचा मुक्काम लांबला. यामुळे वातावरणात गारवा होता. स्वाइन फ्लूच्या विषाणूसाठी गारवा असलेले वातावरण पोषक असते. यामुळेच स्वाइन फ्लूग्रस्तांची संख्या वाढली. 385 रुग्णांची नोंद झाली. यातील साथीच्या आजारांनी थैमान घातले होते. मागील तीन महिन्यांमध्ये एकट्या नागपूर जिल्ह्यात स्वाइन फ्लूची 236 जणांना लागण झाली असून यातील 20 जण ग्रामीणमधील तर शहरातील 6 जण दगावले आहेत. नवीन वर्ष सुरू झाले तेव्हापासून स्वाइन फ्लू बाधित रुग्ण आढळून येत आहेत. उपचारादरम्यान दगावलेल्यांमध्ये सर्वाधिक 19 रुग्ण हे चंद्रपूर जिल्ह्यातील होते. तर भंडारा, गोंदियातील प्रत्येकी 6 जण दगावले आहेत. 
रुग्णांची हेळसांड 
नागपूर हे मेडिकल हब बनले असून मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यांतून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी नागपुरात येतात. यावर्षी मध्य प्रदेशातील 45 जण स्वाइन फ्लू च्या उपचारासाठी नागपुरातील विविध खासगी रुग्णालयात आले होते. मेडिकलसह महापालिकेतील स्वतंत्र स्क्रिनिंग सेंटर बंद करण्यात आल्यामुळे या रुग्णांची हेळसांड होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com