खासगीत स्वाइन फ्लूग्रस्तांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

मेडिकलमध्ये एकही रुग्ण नाही
नागपूर - शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूबाधितांची गर्दी आहे. मात्र, मेडिकलमध्ये एकही स्वाइन फ्लूबाधित नसल्याची माहिती आहे. विशेष असे की, खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचे नमुनेदेखील मेयोतील प्रयोगशाळेतून निगेटिव्ह येत असल्याची बाब उघड झाली.

खासगीत एका महिलेचे स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह नमुने मेयोच्या तपासणीतून निगेटिव्ह आले. सार्वजनिक आरोग्य विभागाने स्वाइन फ्लूबाधितांमध्ये नोंद केली, तर महापालिकेने या महिलेची नोंद स्वाइन फ्लूबाधितांच्या यादीत केली नाही. स्वाइन फ्लूने आतापर्यंत जानेवारीपासून सहा जणांचे प्राण घेतले. आरोग्य विभागात आतापर्यंत 37 जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाल्याची नोंद आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातल्या प्रयोगशाळेत गेल्या आठ दिवसांत पाच जणाच्या चाचण्या दोषी आढळल्या. स्वाइन फ्लूची लक्षणे आढळलेल्या 136 जणांची आतापर्यंत चाचणी करण्यात आली. त्यापैकी दोषी आढळलेले 37 रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

सिरपचा तुटवडा
मेडिकलच्या औषध विभागात स्वाइन फ्लूच्या सिरपचा तुटवडा आहे. मुलांना देण्यात येणाऱ्या टॅमी फ्लू सिरपचा साठा संपला आहे. 45 मिलिग्रॅमच्या 3234, तर 75 मिलिग्रॅमच्या केवळ 130 गोळ्या शिल्लक राहिल्या आहेत.

Web Title: swine flu affected in private hospital