स्वाइन फ्लूने महिला दगावली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र दिसत होते. परंतु, स्वाइन फ्लूच्या विषाणू उकाड्यातही तग धरून आहे. तीन दिवसांत तीन जण दगावले. मंगळवारी 34 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही महिला मेडिकलच्या स्वाइन फ्लम वॉर्डात व्हेंटिलेटरवर होती. पुन्हा एक स्वाइन फ्लू बाधित व्हेंटिलेटरवर आहे. 

उमरेड तालुक्‍यातील विहीरगाव परिसरातील ही महिला होती. सुरुवातीला नातेवाइकांनी खेड्यातील दवाखान्यात उपचार केले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर मेडिकलमध्ये हलवले. स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यामुळे तत्काळ घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी मेयोच्या प्रयोगशाळेत पाठवले. मेयोतून स्वाइन फ्लू बाधित असल्याचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच ही महिला मंगळवारी दगावली. महिलेच्या मृत्यूने स्वाइन फ्लूने दगावलेल्या व्यक्तींची संख्या 16 वर पोहोचली आहे. स्वाइन फ्लू बाधितांचा आकडा 63 वर पोहोचला आहे. 

हृदयविकार, श्‍वसनविकार आणि क्षयानंतर आता स्वाइन फ्लूच्या मृत्यूचा आकडा फुगत आहे. शहरात स्वाइन फ्लूचे मृत्यूसत्र सुरू आहे. परंतु, महापालिकेच्या रुग्णालयातून अद्याप नमुने घेण्यात येत नसल्याची माहिती पुढे आली. स्वाइन फ्लूवरील उपचारापासून महापालिकेची रुग्णालये कोसो दूर असतानाही महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र ढिम्म आहे. 

स्वाइन फ्लूच्या प्रतिबंधासाठी 
- साबण किंवा हॅण्डवॉशने वारंवार हात धुवा. 
- शिंकताना नाक आणि तोंडावर हातरुमाल धरा. 
- रुग्णाच्या आसपास गर्दी करू नये. 
- रुग्णाने मास्कचा वापर करावा. 
- एकाच व्यक्तीने रुग्णाची सेवा करावी. 
- रुग्णाने वापरलेले कपडे वापरू नयेत.

Web Title: Swine Flu Female dead