स्वाइन फ्लूचे दोन महिन्यांत 12 बळी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

नागपूर - गेल्या दीड महिन्यात स्वाइन फ्लूचे 41 रुग्ण आढळले असून यातील 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर शहर व जिल्ह्यातील सात रुग्णांचा समावेश असून अमरावती येथील 4, तर छिंदवाडा येथील 1 रुग्ण आहे. जनतेने स्वाइन फ्लूबाबत सतर्क राहून सर्दी, पडसे, खोकला आणि ताप असल्यास इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय मेयो येथे स्वाइन फ्लूच्या आजाराबाबत तपासणी करून घ्यावी, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उमेश नवाडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

स्वाइन फ्लू हा लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेहाचे रुग्णांमध्ये आढळून आल्याचे सांगतांना पहिल्या सात दिवसांत विशेष खबरदारी घ्यावी व तपासणी करावी, असेही त्यांनी सांगितले. स्वाइन फ्लू आजारासाठी आवश्‍यक असलेल्या टॅमीफ्लू हे औषध जिल्ह्यातील 19 औषधी दुकानांमध्ये उपलब्ध आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

स्वाइन फ्लूसंदर्भात सामान्य नागरिकांनीही दक्षता घेणे आवश्‍यक आहे. स्वाइन फ्लूचे लक्षण दिसताच, रुग्णाने स्वत:ला इतरांपासून दूर ठेवत डॉक्‍टरांशी संपर्क करावा. टॅमीफ्लूच्या गोळ्यांसाठी किमतीपेक्षा जास्त दर आकारणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी काही तक्रारी आणि मार्गदर्शन हवे असल्यास या क्रमांकावर 0712-275421 फोन करावा. 

सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी. 

या दुकानात औषध उपलब्ध 
शहर आणि ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांसह सिपला लिमिटेड वाडी नागपूर (डेपो), कुकरेजा एजन्सी गांधीबाग नागपूर (थोक विक्रेता), नीता एजन्सी गांधीबाग नागपूर, हेटरो डर्ग्स (डेपो), अबोट व्हॅक्‍सीन (डेपो), किरकोळ विक्रत्यांमध्ये कमल मेडिकल ऍण्ड जनरल स्ट्रोर खामला नागपूर, श्री मेडिकल ऍण्ड जनरल स्टोअर वर्धा रोड, बॉम्बे मेडिकोज धंतोली, म्युर मेमोरियल हॉस्पिटल ऍण्ड जनरल स्टोअर सीताबर्डी, तारा न्युरो धंतोली, वसंत मेडिकल स्टोअर रामदासपेठ, बॉम्बे मेडिकल स्टोअर सीताबर्डी, जयअंबे मेडिकल ऍण्ड जनरल स्टोअर जलालखेडा (नरखेड), लता मंगेशकर डिगडोह, सचिन मेडिकोज प्रतापनगर, वोक्‍हार्ट मेडिकल आणि जयझुले मेडिकोज. 

Web Title: Swine flu has 12 victims in two months