नागपूर शहरात १७१ जणांना स्वाइन फ्लू लागण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मार्च 2019

नागपूर - मनपाचा आरोग्य विभाग स्वाइन फ्लू प्रतिबंधाबाबत सुस्त आहे. मनपाच्या एकाही हेल्थपोस्टमध्ये गर्भवतींना स्वाइन फ्लूचे लसीकरण होत नाही. विशेष म्हणजे नागपूर विभागात २४१ स्वाइन फ्लू बाधितांपैकी १७१ लागणग्रस्त नागपुरात आहेत. त्या तुलनेत एकूण २२ मृत्यूंमध्ये १३ मृत्यू नागपूर शहरातील असूनही महापालिकेचा आरोग्य विभाग गंभीर नाही. 

मेयो, मेडिकल व महापालिका स्वाइन फ्लूवर प्रतिबंधात्मक लस असो की, टॅमिफ्लू औषधाचा डोस खरेदी न करता सार्वजनिक आरोग्य विभागाकडे मागणी अर्ज सादर करतात. आरोग्य विभाग मात्र उदारमताने साऱ्यांना औषधाचे वितरण करते. पूर्व विदर्भात स्वाइन फ्लूची दहशत आहे. गर्भवती माताही या आजाराच्या विळख्यात आहेत. यामुळे गर्भवतींचे लसीकरण करण्यासंदर्भात सूचना असताना आरोग्य विभागासह मेडिकल, मेयो, डागासह नागपूर महापालिकेच्या रुग्णालये या लसीकरणाबाबत गंभीर नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मनपाचे स्वतंत्र अंदाजपत्रक 
मेयो, मेडिकल तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाचे स्वतःचे स्वतंत्र आर्थिक अंदाजपत्रक आहे. मात्र या अंदाजपत्रकातून खरेदीचे धोरण तयार करण्याची गरज होती. परंतु, अद्याप मेडिकल, मेयो आणि महापालिकेने स्वाइन फ्लू लस खरेदीसंदर्भात कोणतेही धोरण ठरवले नाही. लसीसोबतच औषधांची मोफत मागणी मेयो, मेडिकल, महापालिकेकडून करण्यात येते. यापूर्वी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सा सावंत यांनी स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस खरेदीचे स्वतंत्र धोरण संबधितांनी करावे अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, आरोग्यमंत्र्यांच्या या विधानाला कोणीही गंभीरतेने घेतले नाही.

Web Title: Swine Flu Sickness Health Care