नागपूरात पोलिस शिपायावर तलवारीने हल्ला

Crime-Scene
Crime-Scene

नागपूर - जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेकोसाबाग परिसरात पोलिस शिपायावरच तलवारीने हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्रीच्या सुमारास घडला. या प्रकरणी पवन प्रीतसिंग संधू (२१, रा. अथर्वेद, दीक्षितनगर) आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवरून पोलिसांचा वचक कमी झाल्याचे चित्र उपराधानीत आहे.

मेकोसाबाग परिसरात काहीजण तलवार घेऊन लोकांमध्ये दहशत पसरवत असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून जरीपटका पोलिसांना मिळाली. 

या माहितीच्या आधारावर पोलिस ठाण्यातील कर्मचारी आनंदसिंह भानुप्रसाद ठाकूर (३७, रा. रेल्वे कॉलनी, कडबी चौक) हे इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी गेले. त्यावेळी आरोपी पवन व काही मुले हातामध्ये तलवार घेऊन मारपीट करीत होते. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता पवन व त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला केला. यात आनंदसिंग हे जखमी झाले. यानंतर पोलिसांनी आरोपी पवन याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, हल्ला करणे आणि शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आनंदसिंह ठाकूर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com