अभ्यासक्रमात संघाबरोबर काँग्रेसचाही इतिहास - डॉ. सतीश चाफले

Congress
Congress

नागपूर - स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योगदानाचा नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात केलेला समावेश सध्या चांगलाच चर्चेचा विषय झाला असला तरी, संघासोबत काँग्रेस आणि इंडियन मुस्लिम लीगचा इतिहासाच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत असल्याचे सांगून अभ्यास मंडळाचे सदस्य सतीश चाफले यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. 

संघाची स्थापना व सरसंघचालकांचे संदर्भ एम. ए. इतिहासाच्या अभ्यासक्रमात २००३ पासून शिकविले जात आहेत. विद्यार्थ्यांना काँग्रेस व इंडियन मुस्लिम लीगचा इतिहासही शिकविला जातो. या तीनही संदर्भाची ओळख विद्यार्थ्यांना बी.ए. पदवी दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात व्हावी, यादृष्टीने अभ्यासक्रम तयार केला आहे, याकडे चाफले यांनी लक्ष वेधले. 

एम.ए. इतिहासाच्या अभ्यासक्रमात विदर्भाचा इतिहास या पाठात संघाचे संदर्भ आधीच समाविष्ट आहे. विद्यार्थ्यांना ते आत्मसात करण्यास अवघड जात आहे. त्यामुळे बी.ए.मध्ये संघपरिचय लघू स्वरूपात मांडण्यात आला आहे. वसाहतवादी इतिहासाचे लेखन, साम्राज्यवादी, समाजवादी, मार्क्‍सवादी व नवमार्क्‍सवादी इतिहास लेखन, आधुनिक व नवआधुनिकतावादी इतिहास लेखन होणे आवश्‍यक होते, मत डॉ. चाफले यांनी व्यक्‍त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com