केंद्र, राज्य सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

नागपूर : संवैधानिक अधिकार डावलले जात असल्याने आक्रमक झालेल्या हलबा समाजातर्फे रविवारी (ता.8) केंद्र व राज्य सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून रोष व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी सुमारे आठ आंदोलकांना ताब्यात घेतले.

नागपूर : संवैधानिक अधिकार डावलले जात असल्याने आक्रमक झालेल्या हलबा समाजातर्फे रविवारी (ता.8) केंद्र व राज्य सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून रोष व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी सुमारे आठ आंदोलकांना ताब्यात घेतले.
हलबा क्रांती सेना आणि सहयोगी संस्थांतर्फे रविवारी आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर गोळीबार चौकात पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी 12 वाजताच्या सुमारास पाचपावली परिसरातून प्रतीकात्मक अंत्यात्रेला सुरुवात झाली. अंगाला पाने गुंडाळलेल्या आंदोलनकर्त्यांनी तिरडी खांद्यावर घेत परिसर पिंजून काढला. सरकारचा धिक्कार नोंदवित निघालेली अंत्ययात्रा गोळीबार चौकात पोहोचताच पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी झडप घालीत तिरडी ताब्यात घेतल्याने आंदोलक अधिकच संतापले. त्यांनी गोळीबार चौकात ठाण मांडत सरकारच्या नावाने बोंब ठोकीत "रडगाणे' गायीले. निवडून येताच 15 दिवसांत हलबांना न्याय मिळवून देण्याची घोषणा सत्ताधाऱ्यांनी केली होती. सहा वर्षे लोटूनही सरकारला न्याय देता आला नाही. न्याय देण्यापूर्वीच सरकार मेल्याच्या आरोळ्या देत सरकारचे श्राद्धही घालण्यात आले. या आंदोलनामुळे चौकातील चारही बाजूची वाहतूक खोळंबली होती. वाहनांच्या रांगा वाढत असल्याने आंदोनकर्त्यांना ताब्यात घेत तहसील पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Symbolic funeral of Central, State Government