"ताई, माई, अक्का' मतदानापुरत्याच।

file photo
file photo

यवतमाळ : महिलांनी पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात केवळ दोनच महिलांना आमदार म्हणून प्रतिनिधित्वाची संधी मिळाली. आता होऊ घातलेल्या निवडणुकीत पुरुष उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांच्या दावेदारीकडे काणाडोळा केल्याने "ताई, माई, अक्का' केवळ मतदानापुरत्याच उरल्याची चर्चा सुरू आहे.

गेल्या 1962च्या निवडणुकीत कॉंग्रेसने छबूताई डाहाके यांना उमेदवारी दिली. मात्र, अपक्ष जांबूवंतराव धोटे यांचा निसटता विजय झाला. गेल्या 1967मध्ये पुसद मतदारसंघामध्ये अपक्ष नलिनी मुखरे यांनी कॉंग्रेसचे वसंतराव नाईक यांच्या विरोधात लढत दिली. त्यातही नाईक यांचा विजय झाला. वणी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसने विमल गोहोकर यांना उमेदवारी दिली. अपक्ष उमेदवार दादा नांदेकर यांच्या गळ्यात कमी मतांनी विजयाची माळ पडली. गेल्या 1990मध्ये दारव्ह्यातून जनता दलाने संध्या इंगोले यांना उमेदवारी दिली. त्यात त्यांचा पराभव झाला, तर 1990मध्ये कॉंग्रसने यवतमाळातून ऍड. विजया धोटे यांना उमेदवारी दिली. मात्र, जनता दलाचे अण्णासाहेब पारवेकर यांनी त्यांचा पराभव केला. दिग्रसमधून 2004च्या निवडणुकीत बसपच्या रत्ना आडे यांचाही पराभव झाला. पुसदमधून 2002 व 2009मध्ये शिवसेनेने डॉ. आरती फुपाटे यांना उमेदवारी दिली. दोन्ही निवडणुकीत मनोहर नाईक यांनी त्यांचा पराभव केला. विजया धोटे व नंदिनी पारवेकर यांना पोटनिवडणुकीतून विधानसभेत प्रतिनिधित्व करता आले. पुरुषांच्या खालोखाल महिला मतदारांची संख्या असताना त्यांना राजकीय पक्षांनी दुर्लक्षित केल्याचा आरोप ऐकायला मिळत आहे. महिला पदाधिकारी, कार्यकर्ता केवळ प्रचारातच दिसत आहेत. सातही मतदारसंघ मिळून दहा लाख 47 हजार 122 महिला मतदार असताना, त्यांना केवळ मतदान करूनच समाधानी रहावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com