जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्यावर कारवाई करा; पत्रकारांची मागणी

अनिल दंदी
बुधवार, 2 जानेवारी 2019

बाळापूर (अकोला) : मोर्णा महोत्सवाचे अपयश झोंबलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलावून पत्रकारांचा अपमान केला. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज बाळापूर तालुक्यातील पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केले. उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे यांच्यामार्फत हे निवेदन देण्यात आले आहे. 

अकोला शहरात नुकत्याच पार पडलेल्या मोर्णा महोत्सवास सर्वात जास्त प्रसिद्धी न दिल्याने पित्त खवळलेले जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी वर्तमानपत्रांचे संपादक व पत्रकारांना चहापाण्यासाठी बंगल्यावर बोलावून गढूळ पाणी पिण्यासाठी देत अपमानास्पद वागणूक दिली. याचबरोबर वृत्तपत्रांची फेकाफेक करत अर्वाच्च्य भाषा वापरली. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत तालुक्यातील इतर व मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने कारवाईच्या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे यांच्यामार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनावर रमेश ठाकरे, रामदास वानखडे, अनंत वानखडे, सुरेश नागापूरे, अनिल गिऱ्हे, प्रा. प्रविण ढोणे, उत्तम दाभाडे, उमेश जामोदे, विलास बोरचाटे, अनिल दंदी, डॉ अतीकुर रेहमान, अमोल जामोदे, दीपचंद चव्हाण, अमोल जामोदे, अहेसान खान, शिवदास जामोदे, सुधीर कांबेकर, गणेश सुरजुसे, गजानन रौंदळे, शहाबाज देशमुख यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

Web Title: Take action against Collector Pandey Local Journalist Demands