मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या तक्रारीवर निर्णय घ्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

नागपूर - विधानसभा 2014 ची निवडणूक लढविताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्जामध्ये त्यांच्यावरील दोन गुन्ह्यांची माहिती नोंदविली नव्हती. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीवर आयोगाने निर्णय घ्यावा, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. यावर न्यायालयाने जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांना नोटीस बजावली.

ऍड. सतीश उके यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर सुनावणी झाली. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी फडणवीसांनी दिलेल्या शपथपत्रामध्ये त्यांच्यावरील दोन गुन्ह्यांचा समावेश नव्हता. त्यांनी ही माहिती जाणीवपूर्वक लपविली असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. फडणवीस यांनी माहिती दडविल्याची तक्रार दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यावरून त्यांनी 2 ऑक्‍टोबर 2014 रोजी फडणवीस यांना नोटीस बजावली. परंतु, त्या तक्रारीवर अद्यापपावेतो कुठलीही कार्यवाही झाली नाही. यामुळे ऍड. उके यांनी ही याचिका दाखल केली आहे.

याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना उत्तर मागितले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 16 जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने "इन पर्सन' बाजू मांडली.

Web Title: Take the decision on the complaint against the Chief Minister