वनरक्षक परीक्षा प्रक्रियेची न्यायिक चौकशी करा

file photo
file photo

यवतमाळ : वनरक्षक परीक्षेमध्ये रविवारी (ता. नऊ) उडालेल्या गोंधळामुळे महापरीक्षा पोर्टलवर दोषारोप होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी परीक्षार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी (ता. 10) दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यवतमाळ वनविभागातर्फे वनरक्षकपदासाठी रविवारी (ता. नऊ) परीक्षा घेण्यात आली. ऑनलाइन परीक्षा असल्याने महापरीक्षा पोर्टलवर घेण्यात आली. मात्र, परीक्षेत नियोजनाअभावी संपूर्ण गोंधळ उडाला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रविवारी (ता. नऊ) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परीक्षार्थीही निवेदनद्वारे आपली बाजू मांडली. त्यानंतर सोमवारी (ता. 10) स्पर्धा परीक्षा समन्वय समितीतर्फे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेण्यात आली. परीक्षा केंद्रावर घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. एकाच संगणकावर दोन ते तीन परीक्षार्थी बसवून पेपर सोडवीत होते. निश्‍चित वेळेपासून दीड ते दोन तास उशिराने परीक्षा घेण्यात आली. महापरीक्षा पोर्टलवर प्रशासनाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचा आरोप परीक्षार्थ्यांचा आहे. याशिवाय नुकसानभरपाई, परीक्षार्थ्यांना निश्‍चित वेळेत बोलविण्यात यावे, दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परीक्षार्थ्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com