esakal | ऑर्वेलचे साहित्य, संदेश लोकांपर्यंत न्या : सुरेश द्वादशीवार
sakal

बोलून बातमी शोधा

ऑर्वेलचे साहित्य, संदेश लोकांपर्यंत न्या :  सुरेश द्वादशीवार

ऑर्वेलचे साहित्य, संदेश लोकांपर्यंत न्या : सुरेश द्वादशीवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : ऑर्वेलचे साहित्य आणि संदेश थेट लोकांपर्यंत नेण्याचा हा काळ आहे आणि ते आपले कर्तव्य आहे, असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष सुरेश द्वादशीवार यांनी केले.
कॉपर कॉइन, अथेनिअम लिटररी असोसिएशन, हिस्लॉप कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. 24) आयोजित केलेल्या "नो युअर ऑथर' या कार्यक्रमच्या उद्‌घाटन सत्रात ते बोलत होते. अभ्याससत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके होते. गेल्या वर्षांपासून, कॉपर कॉइनने "नो युअर ऑथर' या अभ्याससत्राचे आयोजन करायला सुरुवात केलेली आहे. या पूर्वी, जगप्रसिद्ध नाटककार सॅम्युएल बेकेट आणि अभिजात कादंबऱ्यांचे लेखक फयोदोर दस्तऐव्हस्की या दोन लेखकांवर अशी अभ्याससत्रे शेगाव व नांदेड येथे आयोजित केली होती. या मालिकेतील तिसरे सत्र हिस्लॉप कॉलेज, नागपूर येथे आयोजित करण्यात आले असून त्यात ऑर्वेलचे साहित्य, त्याचे विश्वसाहित्यातील योगदान आणि त्याची प्रासंगीकता या विषयावर दोन दिवस महाराष्ट्रातील काही अभ्यासक आपले अभ्यासपूर्ण लेख वाचणार आहेत आणि त्यावर इतर अभ्यासक आणि सहभागी वाचक चर्चा करणार आहेत.
loading image
go to top