हा घ्या पुरावा! गडचांदूर पोलिसांनी केला 73 लाखांचा दारूसाठा नष्ट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : दारूने पोलिस ठाण्याचा मालखाना फुल्ल झाल्याने आता नवीन गुन्ह्यात पकडण्यात येणारी दारू ठेवायची कुठे, हा प्रश्न पोलिस प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. मात्र दारू नष्ट करण्यासाठी पोलिस प्रशासनाने न्यायालयाकडे परवानगी मागितली. येथील पोलिस विभागाने शनिवारी (ता. 28) 73 लाखांची देशी, विदेशी दारू नष्ट केली. 2015 ते 2019 या वर्षात ही दारू पकडण्यात आली होती. या दारूने पोलिस ठाण्याचा मालखाना फुल्ल झाल्याने नवीन गुन्ह्यात पकडण्यात येणारी दारू ठेवायची कुठे, हा प्रश्न पोलिस प्रशासनासमोर निर्माण झाला होता.

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : दारूने पोलिस ठाण्याचा मालखाना फुल्ल झाल्याने आता नवीन गुन्ह्यात पकडण्यात येणारी दारू ठेवायची कुठे, हा प्रश्न पोलिस प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. मात्र दारू नष्ट करण्यासाठी पोलिस प्रशासनाने न्यायालयाकडे परवानगी मागितली. येथील पोलिस विभागाने शनिवारी (ता. 28) 73 लाखांची देशी, विदेशी दारू नष्ट केली. 2015 ते 2019 या वर्षात ही दारू पकडण्यात आली होती. या दारूने पोलिस ठाण्याचा मालखाना फुल्ल झाल्याने नवीन गुन्ह्यात पकडण्यात येणारी दारू ठेवायची कुठे, हा प्रश्न पोलिस प्रशासनासमोर निर्माण झाला होता. ही अडचण लक्षात घेऊन दारू नष्ट करण्यासाठी पोलिस प्रशासनाने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाकडून ही परवानगी मिळाल्यानंतर शनिवारी (ता. 28) गोपालपूर रोडवर रोडरोलरने ही दारू नष्ट करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनात व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक प्रकाश काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take this proof! Gadchandur police destroy 73 lakh liquor stores