टाकळघाटच्या आरोग्यसेविकेला मारहाण

file phote
file phote

टाकळघाट (जि. नागपूर) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविकेला युवकांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आकाश कारेमोरे (वय 28), शुभम कारेमोरे (वय 27), रूपेश बावणे (वय 23, सर्व रा. गंगापूर झोपडपट्टी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सविस्तर असे की, फिर्यादी आरोग्यसेविका निर्मला ईश्वर सतई (वय 46, रा. म्हाडा कॉलनी, बुटीबोरी) या टाकळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका आहेत. दैनंदिन वेळेनुसार आरोग्यसेविका सतई आपल्या रात्रपाळीच्या कामावर आल्या. त्याचवेळी त्यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी देवाशीश झा व मेश्राम हे कर्तव्यावर होते. त्याचवेळी रात्री साडेबारा-एकच्या सुमारास एक अज्ञात रुग्ण महिलेसह आला. त्यांच्यासोबत तीन-चार युवक आले. पूर्वी येथून औषध घेऊन आराम न झाल्याने वाद घालण्यास व डॉक्‍टराकडून त्वरित उपचार व सलाइन लावण्याचा आग्रह धरला. त्यावेळी आरोग्यसेविका सतई कर्तव्यावर असताना त्यांनी रुग्णाला काय झाले असे विचारपूस केली. त्याचबरोबर डॉक्‍टरांना निवास्थानावरून बोलावले असता त्यावेळी त्यांनी शिवीगाळ व अरेरावी करण्यास सुरुवात केली. त्यातच वैद्यकीय अधिकारी यांनी आपण त्वरित इलाज करू असे म्हणताच युवकांनी आरोग्यसेविकेशी हुज्जत घालत तिला शिवीगाळ करून तिला शासकीय कामात परावृत्त व्हावे म्हणून एक चापटसुद्धा मारली. वैद्यकीय अधिकारी यांनी पोलिसांना माहिती देतो असे सांगताच त्यांनासुद्धा धक्काबुक्‍की करून शिवीगाळ केली. या प्रकाराची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच त्यांनी गुन्हा नोंद करून आरोपींना अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com