सहीसाठी पैसे घेणारा तलाठी थेट ठाण्यात

file photo
file photo

गोंडपिंपरी (जि. चंद्रपूर) ः पन्नास रुपये द्या तेव्हाच सही मारतो. तुम्ही राष्ट्रपतींना किंवा पंतप्रधानांना फोन करा तरीही सही मारणार नाही, अशी भाषा वापरणाऱ्या एका तळीराम तलाठ्याला नागरिकांनी दणका देत पोलिसांच्या हवाली केले. शुक्रवारी दुपारच्या सुमारास गोंडपिपरीच्या तहसील कार्यालयासमोर हा प्रकार घडला.
गोंडपिपरी तालुक्‍यातील चेकदरूर तलाठी साजा येथे पगाडे हे तलाठी दोन महिन्यांपूर्वी रुजू झाले. व्यसनी असलेले पगाडे नेहमीच गैरहजर असायचे. सध्या शेतकरी बांधवांचा महत्त्वपूर्ण हंगाम आहे. सोबत मुलांना दाखल्याकरिता तलाठ्याची सही आवश्‍यक असते. पण तलाठी अनेकदा गैरहजर असल्याने शेतकरी व नागरिक हैराण झाले होते. अशावेळी शुक्रवारी गोंडपिपरी तहसील कार्लयायासमोर आपली बॅग घेऊन तलाठी पगाडे बसले होते. याची माहिती मिळताच दरूर व परिसरातील नागरिक तिथे पोहोचले. यावेळी मद्यावस्थेत असलेल्या तलाठ्याने पैसे घेऊन सही मारणे सुरू केले. त्यामुळे पैसे न देणाऱ्या नागरिकांसोबत तलाठ्याने हुज्जत घातली. त्यामुळे नागरिक संतापले. यावेळी भाजपचे पाणीपुरवठा सभापती राकेश पून तिथे पोहोचले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तलाठ्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com