यवतमाळात वाळूमाफियांची तलाठ्याला धक्काबुक्की

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

महागाव (जि. यवतमाळ) : वाळूतस्करी करणाऱ्या ट्रॅक्‍टरवर जप्तीची कारवाई करीत असताना वाळूमाफियांनी तलाठ्यास धक्काबुक्की केली. याशिवाय दुचाकी चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (ता.14) पहाटे चारच्या सुमारास महागाव-करंजखेडदरम्यान जनुना गावाजवळ घडली. सचिन दीपक खिल्लारे व अक्षय दीपक खिल्लारे अशी संशयितांची नावे आहेत.

तलाठी ललित इंगोले हे कर्मचाऱ्यांसह वाळूमाफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेले होते. सचिन खिल्लारे विनापरवाना वाळूवाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. काही वेळातच अक्षय खिल्लारे हा घटनास्थळी धडकला. इंगोले यांना आरोपींनी धक्काबुक्की करून ट्रॅक्‍टर पळविण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करीत असताना दुचाकी चिरडण्याचा प्रयत्न केला. प्रकरणी तलाठी इंगोले यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talathi beaten by Sand Mafia in yavatmal