यवतमाळ, अमरावतीत तनिष्काचा विजयी जल्लोष 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

नागपूर - "सकाळ माध्यम समूहा'च्या "तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियानाच्या व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमाअंतर्गत अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील केंद्रांवर घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल आज (सोमवारी) जाहीर करण्यात आला. निकाल लागताच तनिष्कांनी एकच जल्लोष केला. गुलाल उधळून त्यांनी लोकशाहीचा आनंदोत्सव साजरा केला. 

अमरावती जिल्ह्यातील 13 ठिकाणी तनिष्काच्या निवडणुकीचे मतदान झाले. या निवडणुकीत त्या त्या तालुक्‍यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. आज, सोमवारी सकाळच्या कार्यालयात मतमोजणी झाली. या वेळी जिल्ह्याच्या विविध भागांतील महिला तसेच त्यांच्या समर्थकांनी चांगलीच गर्दी केली होती. जिल्ह्याच्या तेरा ठिकाणी झालेल्या मतदानाच्या मतपेट्या रात्रीच सकाळ कार्यालयात दाखल झालेल्या होत्या. त्यामुळे सकाळी उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींसमोर या पेट्या उघडण्यात आल्या व मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी आटोपल्यावर विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी या निवडणुकीचे निकाल घोषित केले. 

यवतमाळ जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. आज (सोमवारी) येथील "सकाळ'च्या विभागीय कार्यालयात सकाळी 11 वाजेपासून मतोजणीला प्रारंभ झाला. मतमोजणीनंतर प्रथम व द्वितीय क्रमांकांचे उमेदवार निवडण्यात आले. जिल्ह्यातून सर्वाधिक मते पुसद येथील रुक्‍मिणी आसेगावकर यांना मिळाली. जिल्ह्यातील नऊ केंद्रांवरून 19 उमेदवारांनी निवडणूक लढविली. त्यातील क्रमांक एक व क्रमांक दोनचे उमेदवार जाहीर करण्यात आलेत. विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.

Web Title: tanishka celebrating victory in Yavatmal, Amravati