तनिष्का निवडणुकीसाठी ६६ उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

नागपूर - येत्या १५ ऑक्‍टोबर रोजी होत असलेल्या तनिष्का निवडणुकीच्या प्रचाराने चांगला वेग घेतला आहे. जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्‍यांत २४ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण २४ जागांसाठी ६६ उमेदवार रिंगणात आहेत.

नागपूर - येत्या १५ ऑक्‍टोबर रोजी होत असलेल्या तनिष्का निवडणुकीच्या प्रचाराने चांगला वेग घेतला आहे. जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्‍यांत २४ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण २४ जागांसाठी ६६ उमेदवार रिंगणात आहेत.

नेतृत्वविकास कार्यक्रमाअंतर्गतच्या निवडणूक प्रक्रियेसाठी नवरात्रीपूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. शहर आणि जिल्ह्यातील ६६ तनिष्कांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीच्या निमित्ताने महिला नेतृत्वाला विधिमंडळाच्या सभागृहात जाऊन प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेता येणार आहे. निवडणुकीत चिठ्ठी मतदानाशिवाय ‘मिस्ड कॉल’ सुविधेचा वापर होत आहे. सर्व उमेदवार आपापल्या कामाचा सकारात्मक आणि कल्पक पद्धतीने प्रचार-प्रसार करताना दिसत आहेत. व्हॉट्‌सॲप, फेसबुक, ट्‌विटरवर उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. 
 

व्हॉट्‌सॲप, फेसबुक, टि्‌वटरवर उमेदवारांचा प्रचार

जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांत २४ केंद्रांवर मतदान

शनिवारी गावागावांतील महिला करणार मतदान

 

 

मिस्ड कॉलने करा मतदान
मतदानासाठी पारंपरिक पद्धतीसह मिस्ड कॉलच्या माध्यमातूनही मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवारासाठी स्वतंत्र क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर मिस्ड कॉल करून कोणत्याही महिलेला घरबसल्या मतदान करता येईल.

 

Web Title: tanishka election in nagpur

टॅग्स